माथेरान /संतोष पेरणे : माथेरानच्या पायथ्याशी गेले अनेक वर्षांपासून आदिवासी वाड्या वसलेले आहेत मात्र स्वातंत्र्य काळापासून या आदिवासी पाड्यांना अद्यापही रस्त्यापासून वंचित आहेत. गेले अनेक वर्षापासून हे आदिवासी वाढतील लोक आपल्या श्रमदानातून रस्ता बनवत असतात मात्र हा रस्ता दिवाळीनंतर बनवला जातो. मात्र या रस्त्याला महेश विरले यांनी जेसीपी लावून माती टाकली. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली जोराचा पाऊस असल्यामुळे या धनगर वाडा. बेकरेवाडी अस्सल वाडी नाण्याचा माळ या आदिवासी वाड्यांना जोडणारा रस्त्याचे दूर अवस्था आपल्याला पाहायला मिळत आहे सतत कोसळणाऱ्या पावसामुळे या आदिवासी वाड्यातील लोकांना आपली स्वतःचे वाहन नेण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
माथेरानच्या पायथ्याशी असणाऱ्या आदिवासी वाड्यांना कित्येक काळापासून रस्ता नाही. मात्र हे आदिवासी वाडीतील लोक आपल्या श्रमदानातून रस्ता करत असतात. मात्र यावर्षी हा रस्ता सरपंच महेश विरले यांच्या माध्यमातून करण्यात आला. मात्र या रस्त्यावर दिवाळीनंतर मातीचा भराव टाकण्यात आला त्यानंतर मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली. मुसळधार पाऊस पडल्याने या रस्त्याची दूर अवस्था आपल्याला पाहायला मिळाली. या रस्त्यात मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने दुचाकी स्वार व पायी जाणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात चिखल असल्याने या ठिकाणी वाहन चालवणे देखील अवघड जात आहे. समजा या आदिवासी वाढीमध्ये एखादी मोठी घटना घडली तर या आदिवासी वाढीतील लोकांना या घटनेला सामोरे जाताना खूप मोठा अडचण निर्माण झालेले पाहायला मिळत आहे.
कारण या रस्त्याला कुठल्या प्रकारे वाहन जात नसल्याने या ठिकाणच्या रस्त्याची दूर अवस्था पाहायला मिळत आहे. या रस्त्यावर जेव्हापासून माती टाकण्यात आले. त्यानंतर येथील आदिवासी लोकांचे नाहक हाल आपल्याला पाहायला मिळालेत मात्र माती टाकल्यानंतर कुठलाही राजकीय नेता या रस्त्याकडे डोकावला नाही. मात्र या रस्त्याची दुरावस्था आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी राहणारे आदिवासी लोक आपल्या स्वतःचे बाईक घेऊ आपला प्रवास करत असताना आपला जीव धोक्यात टाकून हा प्रवास करावा लागत आहे. या आदिवासी वाडयांना जोडणारा रस्ता हा एकुण पाच किली मिटर लांबीचा आहे.मात्र या रस्त्यावर मातीचा भराव टकल्याने येथे असणारे जे आदिवासी लोक आहेत. त्यांना पाई चालता सुधा अवघड जात आहे. मात्र रस्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने येथे राहाणारे लोक नाराजी व्याक्त करणार आहे.






