मध्य रेल्वेतर्फे (Central Railway) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागात आज आणि उद्या रात्री मेन(Main Line) आणि हार्बर लाईन (Harbour Line)वर मेगाब्लॉक (MegaBlock) आणि पश्चिम लाईनवर (Western Line) उद्या सकाळी जम्बोब्लॉक (Jumbo Block) घेण्यात येणार आहे.
दि. २०.८.२०२२ च्या रात्री ११.३० ते २१.८.२०२२ च्या पहाटे ४.३० पर्यंत जलद मार्गावर
दि. २१.८.२०२२ रोजी सकाळी १२.४० ते ०५.४० पर्यंत डाऊन जलद मार्गावर
दि. २१.८.२०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ०५.२० वाजता सुटणारी डाऊन जलद मार्गावरील लोकल भायखळा आणि माटुंगा दरम्यानच्या धीम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि ती नियोजित थांब्यांवर थांबून गंतव्यस्थानी १० मिनिटे उशिरा पोहोचेल.
ठाणे येथून दि. २०.८.२०२२ रोजी रात्री १०.५८ आणि ११.१५ वाजता सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि भायखळा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील, त्यांच्या नियोजित थांब्यांनुसार थांबतील आणि निर्धारित वेळेच्या १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
१२०५१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस भायखळा आणि माटुंगा स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. दादर प्लॅटफॉर्म क्रमांक १ येथे या गाडीला दुहेरी थांबा दिला जाईल आणि रोहा येथे १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचेल.
११०५८ अमृतसर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस,
११०२० भुवनेश्वर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस आणि
१२८१० हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नागपूर मार्गे मेल, माटुंगा आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्यांना दादर प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर दोनदा थांबा दिला जाईल आणि गंतव्यस्थानी १० ते १५ मिनिटे उशीराने पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि
चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत पनवेल – कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) विभागात विशेष लोकल अंदाजे २० मिनिटांच्या अंतराने धावतील.
हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइनआणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी असेल.
बोरिवली – गोरेगाव डाऊन फास्ट लाईन आणि बोरिवली – कांदिवली अप स्लो लाईन (सकाळी १०.०० ते दुपारी ०३.००) बोरिवली आणि गोरेगाव दरम्यान डाऊन फास्ट मार्गावर आणि बोरिवली आणि कांदिवली स्थानकांदरम्यान अप स्लो मार्गावर रविवार, २१ रोजी सकाळी १०.०० ते १५.०० वाजेपर्यंत पाच तासांचा जम्बो ब्लॉक (JumboBlock) घेण्यात येईल.
ब्लॉक कालावधीत, अंधेरी आणि बोरिवली स्थानकांदरम्यान सर्व डाऊन फास्ट मार्गावरील उपनगरीय गाड्या डाऊन स्लो मार्गावर चालवल्या जातील. अंधेरी आणि बोरिवली दरम्यान सर्व डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या फलाट क्रमांक ५ वर धावतील. ब्लॉकमुळे काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील. याबाबत सविस्तर माहिती स्टेशन मास्टर्सकडे उपलब्ध आहे.