शरद पवारांनी एनडीएस सोबत येण्याचे आवाहन (फोटो -सोशल मीडिया)
जत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकास पुरुष असून त्यांच्या नेतृत्वात देशाची मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे. आर्थिक दृष्ट्या भारत एक सक्षम देश बनत आहे. त्यामुळे देशाच्या विकासाच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी एनडीए मध्ये यावं. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत येण्यासाठी पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे त्या बाबत आग्रह करेन, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं.
सांगली जिल्ह्यातील जत येथे रिपाइ आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्राचे सहसचिव संजय कांबळे यांच्या प्रयत्नातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात उभारण्यात आलेल्या अभ्यासिका सभागृहाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी रामदास आठवले हे बोलत होते. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत शरद पवार आले असते तर कदाचित ते राष्ट्रपती सुद्धा बनू शकले असते, असं सांगून केंद्रीय मंत्री रामदास आठवले पुढे म्हणाले, कॉमन मिनिमम प्रोग्राम हाती घेऊन मोदी आणि पवार हे दोन नेते एकत्र येणे गरजेचे आहे.
उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही, कारण मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार आहे, अस सांगून केंद्रीय मंत्री रामदास आठवले पुढे म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत राज ठाकरे आमच्यासोबत आले होते, मात्र त्याचा आम्हाला फायदा झाला नाही. उलट विधानसभेला ते आमच्या सोबत नव्हते त्यावेळी आम्हाला जास्त प्रमाणात यश मिळालं. त्यामुळे रोज भूमिका बदलणाऱ्या राज ठाकरे यांचा महायुतीला कसलाही प्रकारचा उपयोग नाही. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यास महाआघाडीमध्ये फूट पडेल आणि त्याचा फायदा महायुतीला होईल असं मत ही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केल.
NDA मध्ये आमच्यावर अन्याय होतोय- रामदास आठवले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमधील केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) बद्दल भ्रमनिरास होऊ लागला आहे. युतीमध्ये ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया- आठवले’ या त्यांच्या पक्षाच्या दुर्लक्षामुळे आठवले दुखावले आहेत आणि संतापले आहेत. रविवारी त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आणि महाआघाडीत आपल्यावर अन्याय होत असल्याचे सांगितले.
Ramdas Athawale News: NDAमध्ये आमच्यावर अन्याय होतोय..; रामदास आठवलेंनी व्यक्त केली खंत