Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा शरद पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले, मोठा अन्याय…

कर्तुत्व असतानाही जाणीवपूर्वक डावलने हा भाऊसाहेब महाराजांवर झालेला मोठा अन्यायच होता, अशी सल सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 26, 2024 | 05:10 PM
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा शरद पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले, मोठा अन्याय...

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा शरद पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले, मोठा अन्याय...

Follow Us
Follow Us:

कराड : अभयसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले होते. १९९९ साली स्व. अभयसिंहराजे भोसले काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत आले नसते तर कदाचित काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्रीपदी बसविले असते. विलासराव देशमुख यांच्यापेक्षा भाऊसाहेब महाराज ज्येष्ठ असताना पक्षाचे नेते शरद पवार यांनी त्यांना का बाजूला केले, संधी का दिली नाही, हे माहीत नाही. परंतु, यामुळे सातारा जिल्ह्यासह राज्याचे मोठे नुकसान झाले. कर्तुत्व असतानाही जाणीवपूर्वक डावलने हा भाऊसाहेब महाराजांवर झालेला मोठा अन्यायच होता, अशी सल सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली.

नुकतीच राज्याच्या सार्वजनिक मंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर येथील प्रीतिसंगमावरील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी मंगळवारी त्यांनी अभिवादन केले. याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना एका प्रश्नाच्या उत्तरादाखल ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार आनंदराव पाटील, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड उत्तरचे नेते रामकृष्ण वेताळ, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, राजेश पाटील – वाठारकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, भाजप तालुकाध्यक्ष पै. धनाजी पाटील, माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, सारिकाताई गावडे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व मंत्री जयकुमार गोरे यांचे यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी स्वागत केले.

हे सुद्धा वाचा : बीड अन् परभणी प्रकरणावरुन पटोलेंचा फडणविसांवर गंभीर आरोप; म्हणाले, सगळं मुख्यमंत्र्यांकडून…

सातारा जिल्हा महायुतीचा बालेकिल्ला

मंत्री भोसले म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राची उभारणी केली. त्यांच्या प्रेरणेने व विचारांवर भाऊसाहेब महाराजांनंतर आम्ही मार्गक्रमण करत आहोत. साताऱ्याने महायुतीला भरभरून यश दिले आहे. त्यामुळे सातारा जिल्हा हा आता भाजप, महायुतीचा बालेकिल्ला झाला आहे. त्यामुळेच आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी भाजप व मित्रपक्षांना मिळून तब्बल चार मंत्रीपदे दिली असून, आम्ही सर्वजण मिळून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यावर भर देणार आहोत. यासाठी चव्हाण साहेबांचे आशीर्वाद व प्रेरणा घेऊन आम्ही कामाला सुरुवात करत आहे.

पालकमंत्री पदासाठी कोणाच्याही नावाची चर्चा नाही

पालकमंत्री पदाबाबत आपल्या नावाची चर्चा? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, पालकमंत्री पदासाठी सध्या कोणाच्याही नावाची चर्चा नसून, याबाबत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून निर्णय घेतील, तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून जिल्ह्यात रस्त्याचे चांगले जाळे निर्माण करणार असून, सर्वांनी बांधकाम विभागाची सर्व कामे, रस्ते, पूल आदी कामे दर्जेदारपणे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. उदयनराजे आणि आमच्यात कधीही वाद नव्हता. नगरपालिका निवडणुकीवेळी एका वार्डात दोन्हीकडील कार्यकर्ते इच्छूक असल्याने काहीवेळा वादाचे प्रसंग उद्भवले. परंतु, भविष्यात आता अशा प्रकारचे वाद होणार नाहीत, असेही त्यांनी यावेळेस स्पष्ट केले.

उरमोडी प्रकल्प मार्गी लावला

भाऊसाहेब महाराजांनी उरमोडी प्रकल्प मार्गी लावला. त्यामुळे मोठे क्षेत्र आज सुजलाम, सुफलाम झाले आहे. त्यांना अधिक संधी मिळाली असती, तर सातारा जिल्ह्यासह राज्याचाची चांगला विकास झाला असता, अशी खंतही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केली. रामराजे आणि तुमच्यातील वादावर पडदा पडला आहे का? या प्रश्नावर बोलताना मंत्री गोरे म्हणाले, आमच्यातील वाद वैचारिक होता. परंतु, फलटण म्हणजे कोणाची वैयक्तिक जहागिरी नाही. जनता हीच फलटणची जहागिरी आहे. असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Web Title: Minister shivendra singh raje bhosale has made serious allegations against sharad pawar nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2024 | 05:08 PM

Topics:  

  • BJP
  • maharashtra
  • Nationalist Congress Party
  • Satara News
  • Shivendra Raje

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
4

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.