अमजद खान, कल्याण : विकास कामांवरुन मनसे (MNS) अणि शिवसेनेच्या (Shivsena) शिंदे गटात (Shinde Group) चांगलीच जुंपली आहे. शिवसेना युवा सेना नेते दिपेश म्हात्रे (Dipesh Mhantre) यांनी कल्याण ग्रामीणमधील विकास कामे थांबविण्यासाठी मनसे आमदार जबाबदार असल्याची टीका केली आहे. तर दुसरीकडे गेल्या अनेक वर्षांपासून विकास प्रकल्प रखडले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या घोषणा केल्या जातात. काही कामे पुढे सरकवतात. नंतर त्याचे काही होत नाही, अशी टीका मनसे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी खासदार आणि शिवसेनेवर केली आहे.
[read_also content=”विधिमंडळात शिवसेनेचा एकच गट नेता आणि प्रतोद, दुसऱ्या गटाची माहितीच नाही, हे काय म्हणाले विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर? https://www.navarashtra.com/maharashtra/there-is-only-one-group-leader-of-shiv-sena-in-the-legislature-and-pratod-there-is-no-information-about-the-other-group-says-rahul-narvekar-nrka-371578.html”]
शिवसेना युवा सेना नेते दिपेश म्हात्रे यांनी आज मोठा गाव ठाकूर्ली ते माणकोली खाडी पूलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की, डोंबिवली पश्चिमेत मोठी डेव्हलमेंट होत आहे. आम्ही जी विकास कामे करतो ती टेक्नीकली साऊंड असतात. पलावा जंक्शन येथे वाहतूक कोंडी होते. त्याठिकाणी डेव्हलमेंट झाली. त्यानंतर पुलाचे काम सुरु झाले. पलावा जंक्शनचे काम रखडण्यात काही झारीतील शुक्राचार्य आहे. त्यामुळे कामे होत नसल्याची टीका म्हात्रे यांनी केली. मनसे आमदार राजू पाटील यांचा नामोल्लेख न करता त्यांनी पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पलावा उड्डाणपूलाच्या कामाला गती देण्याचे काम हाती घेतले आहे. विकास कामे पूर्ण करण्यात खासदार पटाईत आहेत.
म्हात्रे यांच्या टीकेचा मनसे आमदार राजू पाटील यांनी समाचार घेतला आहे. पाटील यांनी सांगितले की, माझी सातत्याने मागणी हीच आहे की कल्याण शीळ रोड किंवा मानकोली ब्रीज असू देत त्याला पर्याय उपलब्ध करून त्या प्रकल्पाचा विचार केला पाहिजे. निवडणूक आली की लोकप्रिय घोषणा करायच्या आणि निवडणुकीच्या तोंडावर काम पुढे सरकावयाचे या अनुषंगाने केलेली ती मागणी आहे. यात टीका करण्यासारखं काहीच नाही. मी वस्तुस्थिती मांडली आहे. ज्यांना झोंबली त्यांना झोंबु दे असा टोला त्यांनी लगावला.
खासदारांनी मोठा गाव ते कोपर रस्त्यासाठी 18 कोटी, मोठा गाव ठाकूर्ली ते दुर्गाडी या रिंग रोडच्या तिसऱ्या टप्प्याकरीता 570 कोटीची निविदा एमएमआरडीएच्या माध्यमातून मंजूर केली आहे. रेल्वे फाटकाच्या पुलाचे काम सुरु झाले आहे. खासदारांमुळे विकास कामे मार्गी लागत आहेत. मोठा गाव ठाकूर्ली ते माणकोली खाडी पूलाचे काम 84 टक्के झाले असून या पूलाच्या कामाचा एक्सपान्शन जॉईन करणे हा शेवटचा टप्पा आहे. या कामाची पाहणी खासदार डॉ. शिंदे हे करणार आहे. हा पूल वाहतूकीसाठी एप्रिल महिन्यात खुला होईल, असे म्हात्रे यांनी सांगितले.