मुंबई : आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईत मनसेची बैठक बोलावली होती. मुंबईतील बांद्रा येथे मनसेची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना २७ नोव्हेंबरला मुंबईत मनसेचा मेळावा (MNS Melava) होणार असल्याचं सांगितलं. तसेच आपण कोल्हापूर येथे अंबाबाईचे दर्शन घेऊन कोकण दौरा करणार आहोत, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
[read_also content=”ठाकरे गटाचे ‘मिशन इलेक्शन’, १४ नोव्हेंबरपर्यंत मातोश्रीवर बैठकांचे सत्र https://www.navarashtra.com/maharashtra/thackeray-group-mission-election-session-of-meetings-on-matoshree-till-november-fourteen-340658.html”]
दरम्यान, आज मनसेच्या बैठकीत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली. ध्येय धोरणांचा अहवाल दया, असं राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना आदेश दिले. तसेच मनसेनी केलेली कामं लोकांपर्यंत पोहचवा असं राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना आदेश दिले असल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी त्यांनी राज्यातून बाहेर प्रकल्प जाताहेत यावर टिका केली. महाराष्ट्रातून बाहेर पडणारा प्रत्येक प्रकल्प गुजरातला जातोय हे वाईट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर विचार करायला हवा. पंतप्रधान हे सर्व देशाचे आहेत. अशी टिका राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर केली.