Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागणार? वाढत्या खर्चामुळे भाडेवाढीचे प्रताप सरनाईकांकडून संकेत

ST Bus Fare Increase : राज्यातील एसटी प्रवाशांसाठी पुढील काळात प्रवास महाग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वाढते इंधन, देखभाल आणि परिचालन खर्च यांचा दाखला देत एसटी भाडेवाढीचे संकेत दिले आहेत. अंतिम निर्णय अद्याप झालेला नसला तरी शासन लवकरच याबाबत आढावा घेऊन घोषणा करण्याची शक्यता आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 05, 2026 | 05:10 PM
एसटी प्रवास महागणार? वाढत्या खर्चामुळे भाडेवाढीचे प्रताप सरनाईकांकडून संकेत

एसटी प्रवास महागणार? वाढत्या खर्चामुळे भाडेवाढीचे प्रताप सरनाईकांकडून संकेत

Follow Us
Follow Us:
  • एसटी प्रवास महागणार?
  • वाढत्या खर्चामुळे भाडेवाढीचे प्रताप सरनाईकांकडून संकेत
  • एसटी सेवा ही ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी जीवनवाहिनी
Maharashtra ST News Marathi : राज्यातील एसटी प्रवाशांसाठी पुढील काळात प्रवास खर्च वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी वाढत्या इंधन दर, देखभाल खर्च आणि परिचालन खर्चाचा दाखला देत एसटी भाडेवाढीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे लाखो प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळ सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत असून डिझेलचे वाढते दर, बसेसच्या दुरुस्तीचा खर्च, कर्मचाऱ्यांवरील आर्थिक भार आणि इतर परिचालन खर्च सातत्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल वाढवण्यासाठी भाडेवाढ हा पर्याय विचाराधीन असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

दारू दुर्घटनासंदर्भातील मालवणी समितीच्या शिफारसींचे काय झाले? फडणवीस सरकारने खुलासा करावा; काँग्रेसची मागणी

यावेळी प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, एसटी सेवा ही ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी जीवनवाहिनी आहे. त्यामुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकताना शासनाला सर्व बाजूंचा विचार करावा लागणार आहे. अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नसला तरी लवकरच यासंदर्भात सविस्तर आढावा घेऊन शासन स्तरावर निर्णय घेतला जाऊ शकतो. दरम्यान, संभाव्य भाडेवाढीच्या चर्चेमुळे रोज एसटीने प्रवास करणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. शासनाने प्रवाशांना दिलासा देत आर्थिक ताळमेळ साधणारा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, एसटीला दररोज सरासरी १० लाख ८७ हजार लिटर इतके डिझेल लागत असून इंधनावर वर्षाला सरासरी ३ हजार ४०० कोटी रुपये इतका खर्च होत आहे.मोठ्या प्रमाणात इंधनावर होणारा खर्च टाळण्यासाठी व महाराष्ट्रात मूल्यवर्धित कर २१ टक्के इतका असल्याने व त्या तुलनेत गुजरात मध्ये मूल्यवर्धित कर १४. ९ टक्के इतका कमी असल्याने महामंडळाच्या फायद्याचा दृष्टीने गुजरात मधून डिझेल खरेदी करण्याचा निर्णय एसटी महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मध्यंतरी घेतला होता. ती फाईल सरकारकडून मंजूर करण्यात आली असून त्यातून २५१ डिझेल पंपापैकी ९४ पंपावर लागणारे डिझेल कमी दरात मिळेल.

एसटी ही सार्वजनिक वाहतूक असल्याने तिला मदत व्हावी यासाठी राज्यस्थान सरकारने तिथल्या एसटीच्या इंधन दर खरेदी मूल्यवर्धित करात सूट दिली असून सद्या राज्यस्थान मध्ये १८. ५ टक्के इतका मूल्यवर्धित कर असला तरी तिथल्या एसटीला त्यात सूट मिळाली असून तो १४ टक्के इतका आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुद्धा एसटीला मूल्यवर्धित करातून सूट दिली पाहिजे अन्यथा १२००० कोटी रुपयांचा संचित तोटा व ५००० कोटी रुपयांची वैधानिक देणी रक्कम थकीत असलेल्या एसटीसाठी ही धोक्याची घंटा ठरेल असेही बरगे यांनी म्हटले आहे.

Ulhasnagar News: रस्ते खणले, मार्ग बंद केले; खोदकामांमुळे उल्हासनगरातील वाहनचालकांचा प्रवास झाला त्रासदायक

Web Title: Msrtc bus fare hike likely pratap sarnaik hints rising operational costs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 05:10 PM

Topics:  

  • maharashtra
  • msrtc
  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

धाराशिवात मुसळधार पावसालाही न जुमानता आंबेडकरी एल्गार! आनंदराज आंबेडकरांनी दिला सरकारला इशारा
1

धाराशिवात मुसळधार पावसालाही न जुमानता आंबेडकरी एल्गार! आनंदराज आंबेडकरांनी दिला सरकारला इशारा

शिवाजीराव आढळराव पाटलांचं खासदार अमोल कोल्हेंना आव्हान; ‘या’ प्रकल्पाबाबतही विचारला सवास
2

शिवाजीराव आढळराव पाटलांचं खासदार अमोल कोल्हेंना आव्हान; ‘या’ प्रकल्पाबाबतही विचारला सवास

जिल्हा परिषदेच्या आदेशालाच हरताळ! ७ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश; ५० दिवस उलटूनही चौकशीही नाही
3

जिल्हा परिषदेच्या आदेशालाच हरताळ! ७ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश; ५० दिवस उलटूनही चौकशीही नाही

Bhandara: ३ महिन्यात दूध संकलनात मोठी घट; प्रशासकीय कारवाईचा धसका! भेसळ प्रकरण निरंक
4

Bhandara: ३ महिन्यात दूध संकलनात मोठी घट; प्रशासकीय कारवाईचा धसका! भेसळ प्रकरण निरंक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.