वामन म्हात्रेंच्या अडचणीत वाढ (फोटो- टीम नवराष्ट्र)
बदलापूर येथे चार वर्षांच्या मुलीवर अत्याचाराची दुर्दैवी घटना घडली. बदलापूर येथील एका शाळेत ही गंभीर घटना घडली. यानंतर या घटनेच्या विरुद्ध हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. बदलापूर रेल्वे स्थानकात ८ ते ९ तास आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळेस या घटनेचे वृत्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराबद्दल माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी आक्षेपार्ह भाष्य केले होते. महिला पत्रकाराबद्दल अपशब्द वापरले होते. यानंतर वामन म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता त्यापाठोपाठ मुंबई हायकोर्टाने देखील म्हात्रेंना मोठा दणका दिला आहे.
बदलापूर घटनेच्या विरोधात रेल्वे स्थानकावर आंदोलन करण्यात येत होते. त्यावेळीस त्या घटनेचे वृत्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराबद्दल वामन म्हात्रे यांनी अपशब्द वापरले होते. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र मुंबई हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे वामन म्हात्रे यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.
हेही वाचा: वामन म्हात्रेंची जीभ घसरली, महिला पत्रकाराला म्हणाले, तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच…
महिला पत्रकाराला अपशब्द वापरल्याप्रकरणी वामन म्हात्रे यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने अटकपूर्व जामीन देण्यास नका दिला. तसेच याबाबतचा निर्णय कल्याण कोर्टाने घ्यावा असे निर्देश हायकोर्टाने दिले. त्यामुळे जामीन घेण्यासाठी म्हात्रे यांना कल्याणच्या कोर्टात दाद मागावी लागणार आहे. मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर म्हात्रे यांच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये २९ ऑगस्टपर्यंत यावर केल्याने कोर्टाने निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. याआधी कल्याण कोर्टातून अटकेसाठी संरक्षण मिळाले नसल्याने म्हात्रे यांना हायकोर्टात धाव घ्यावी लागली होती.
तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे, अशा भाषेत बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकाराबाबत वक्तव्य केले. बदलापूर अत्याचार प्रकरणाचे वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराबाबत शिंदे गटाचे नेते वामन म्हात्रे यांनी शब्द वापरले आहेत. यामुळे सर्व पत्रकारांमधून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.