फोटो - सोशल मीडिया
बदलापूर : बदलापूरमध्ये अत्याचार प्रकरणामुळे परिस्थिती चिघळली आहे. मागीलपाट तासांपासून आंदोलनकर्ते रेल्वे स्थानकांवर ठिय्या मांडून बसले आहेत. अवघ्या 4 वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचारामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. याठिकाणी मोठी गर्दी झाली असून परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न चालू आहे. हे प्रकरण माध्यमांनी उचलून धरल्यामुळे राज्य सरकार जागे झाले. मात्र या दरम्यान, शिंदे गटाच्या नेत्याने महिला पत्रकाराला खडेबोल सुनावले. मात्र हे सुनावताना त्यांची जीभ घसरली आहे.
तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे, अशा भाषेत बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकाराबाबत वक्तव्य केले. बदलापूर अत्याचार प्रकरणाचे वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराबाबत शिंदे गटाचे नेते वामन म्हात्रे यांनी शब्द वापरले आहेत. यामुळे सर्व पत्रकारांमधून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रकरणाबाबत संवेदनशील आहेत. पण तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील त्यांच्याच पक्षातील नेत्यांची हे वागणे आणि बोलणे अत्यंत लज्जास्पद आहे.
याबाबत शिंदे गटाचे नेते वामन म्हात्रे यांनी अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. बदलापूरमध्ये परिस्थिती तणावपूर्ण आहे. आंदोलकांनी मागील पाच तासांहून अधिक वेळ रेल्वे रुळावर आंदोलन सुरु ठेवले आहे. त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळित झाली आहे. आरोपीला फाशीचीच शिक्षा देण्यात यावी अशी आंदोलकांची मागणी आहे. तर त्यांना समजावण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत.
पोलीसांकडून समजावण्याचा प्रयत्न
बदलापूर रेल्वे स्थानकावर सकाळपासून तणावपूर्ण परिस्थिती आहे. आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून फाशीची शिक्षा झाल्याशिवाय जागेवरुन हालणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. मात्र यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर परिमाण होत आहे. त्यामुळे पोलिसांनी जमावाला शांत करुन समाजवण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात कोणत्या अपराध्याला कशी शिक्षा द्यायची हे आपल्याला लिखीत स्वरूपात दिले आहे. त्यामुळे त्या आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी आपण सर्वजण कायदेशीर प्रयत्न करू. त्याला फाशीचीच शिक्षा होईल यासाठी आपणकायदेशीर मार्गाने लढू. आरोपीला फाशी होण्यासाठी आम्ही देखील १००० ट्क्के सहमत आहोत. उज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून नेमण्यात येईल, हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवू. “असे आश्वासन पोलिसांनी दिले आहेत.