मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) रेल्वे स्थानकातील फलाटाच्या विस्तारीकरण म्हणजेच लांबी वाढवण्यासाठी मध्य रेल्वेकडून ३६ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर वीकेण्डला बाहेर फिरण्याचा प्लॅन करत असाल तर आधी लोकलचे वेळापत्रक नक्की पाहा. कारण ब्लॉकदरम्यान तब्बल लोकलच्या 930 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. तसेच मध्य रेल्वेचा हा जम्बोब्लॉक उद्यापासून म्हणजे शुक्रवार, शनिवार आणि रविवार अनुक्रमे 31 मे, 1 जून आणि 2 जून या दिवशी जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.
ठाणे आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकांचा विस्तार करण्यासाठी मध्य रेल्वेने गुरुवारी रात्रीपासून मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे येथून 30-31 मे च्या रात्री 63 तासांच्या मेगाब्लॉकला सुरुवात होणार आहे. 30-31 मे रोजी रात्री 00.30 सुरुवात होईल ते 2 जून रोजी 15.30 पर्यंत असणार आहे. या कालावधीत ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 चे रुंदीकरण करण्याचे काम करण्यात येणार आहे.
[read_also content=”मुंबईकरांनाही सोसावा लागणार पाण्याचा तुटवडा, कुलाबा ते दादरदरम्यान पाणीपुरवठा बंद https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai-water-shortage-news-marathi-bmc-announces-24-hour-water-cut-in-mumbaic-540264.html”]
तर सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 च्या विस्तारासाठी 31 मेच्या रात्री (सकाळी 12.30) पासून 36 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक 2 जून रोजी दुपारी 12.30 वाजेपर्यंत असेल. तीन दिवस चालणाऱ्या या कामामुळे लोकल गाड्यांबरोबरच लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम होणार आहे. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर कोकणात जाणाऱ्या गाड्या पनवेल स्थानकातून सुटतील.
930 लोकल फेऱ्या रद्द
ब्लॉक दरम्यान, बहुतांश लोकल सीएसएमटी ऐवजी दादर किंवा भायखळापर्यंत थांबा दिला जाईल. तसेच ब्लॉकदरम्यान 930 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वे मुंबई विभागाचे डीआरएम रजनीश कुमार गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेगाब्लॉकमुळे तीन दिवसांत ९३० लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. 930 लोकल सेवेपैकी शुक्रवारी 161, शनिवारी 534 आणि रविवारी 235 लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत.
444 शॉर्ट टर्मिनेट
मध्य रेल्वेने ४४४ लोकल गाड्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी किमान 7 सेवा कमी होतील, तर 306 लोकल ट्रेन सेवा शनिवारी आणि 131 रविवारी कमी होतील. तर शनिवारी 307 लोकल आणि रविवारी 139 लोकल ट्रेन कमी असतील.