खड्ड्यांवर कोट्यवधी रुपयांची उधळण! मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर वॉचडॉग फाऊंडेशनने ओढले ताशेरे
गेल्या काही वर्षांत मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने हजारो कोटी रुपये खर्चुन रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचा घाट घातला असला, तरी प्रत्यक्षात खड्यांच्या नावाखाली होणारी ‘टेंडरबाजी’ थांबण्याचे नाव घेत नाहीये. रस्ते काँक्रीटचे होत असताना खड्डे भरण्यावर दरवर्षी होणारा कोट्यवधींचा खर्च म्हणजे मुंबईकरांच्या करातून जमा झालेल्या पैशांची लूट असून हा प्रकार करदात्यांशी केलेली प्रतारणा असल्याची टीका वॉचडॉग फाऊंडेशन संस्थेच्यावतीने करण्यात आला आहे. वॉचडॉग फाऊंडेशनने महापालिकेच्या या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या आकडेवारी समोर आणली आहे. मुंबईत सुमारे २,०५० किमीचे रस्ते असून त्यापैकी १,३३३ किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे, तर ७०० किमी रस्त्यांचे काम सुरू आहे. तर तांत्रिक निकषानुसार, रस्ता सिमेंट काँक्रीटचा झाला की त्यावर डांबरी रस्त्याप्रमाणे खड्डे पडत नाहीत आणि त्याची देखभालीची गरजही पडत नाही.(फोटो सौजन्य – AI)
मात्र, मुंबई महापालिकेच्या लेखापरीक्षणातून वेगळेच चित्र समोर येते. २०२१ पासून दरवर्षी सरासरी १५० ते २०० कोटी रुपये केवळ खड्डे भरण्यासाठी राखून ठेवले जात आहेत. विशेष म्हणजे, २०२३-२४ मध्ये हा आकडा तब्बल २७५ ते ४०० कोटींच्या घरात गेला होता. चालू आर्थिक वर्षातही १५० कोटींचे नवे टेंडर काढण्यात आल्याने प्रशासनाच्या पारदर्शकतेवर संशय व्यक्त केला जात आहे. वॉचडॉग फाऊंडेशनचे निकोलस अल्मेडा, अॅड, गॉडफ्रे पिमेंटा आणि त्यांच्या सहकाऱ्याऱ्यांनी या खर्चावर आक्षेप घेतले आहे, जर शहराचा बहुतांश रस्ते भूभाग आता कॉक्रीटचा झाला असेल, तर दरवर्षी खड्डे बुजवण्यासाठी इतका मोठा निधी कोणत्या रस्त्यांवर खर्च केला जातो? सिमेंटच्या रस्त्यांवर पडणारे खड्डे हे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत की केवळ ठेकेदाराच्या फायद्यासाठी ही ‘मलमपट्टी’ सुरू आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
महापालिका प्रशासनाने या निधीचा वापर अधिक न्याय्य आणि जबाबदार पद्धतीने करावा, तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचे पिमेटा यांनी म्हटले आहे.वॉचडॉग फाऊंडेशनचे निकोलस अल्मेडा, अॅड, गॉडफ्रे पिमेटा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या खर्चावर आक्षेप घेतले आहे. जर शहराचा बहुतांश रस्ते भूभाग आता काँक्रीटचा झाला असेल, तर दरवर्षी खड्डे बुजवण्यासाठी इतका मोठा निधी कोणत्या रस्त्यांवर खर्च केला जातो? सिमेंटच्या रस्त्यांवर पडणारे खड्डे हे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत की केवळ ठेकेदारांच्या फायद्यासाठी ही ‘मलमपट्टी’ सुरू आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे. महापालिका प्रशासनाने या निधीचा वापर अधिक न्याय्य आणि जबाबदार पद्धतीने करावा, तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचे पिमेंटा यांनी म्हटले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या ‘खड्डेमुक्ती’ अभियानावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते अॅड. अमोल मातेले यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांना ई-मेलद्वारे पाठवलेल्या निवेदनात त्यांनी संभाव्य भ्रष्टाचार व अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केला. दरवर्षी कोट्यवधींचा खर्च होऊनही पावसाळ्यात खड्डे कायम राहत असल्याची टीका त्यांनी केली.मागील पाच वर्षांचा ऑडिट अहवाल जाहीर करावा, तृतीय-पक्ष गुणवत्ता तपासणी आणि दोषी ठेकेदारांवर कारवाई करावी आदी मागण्या मातेले यांनी केल्या असून कायदेशीर कारवाई जनआंदोलनाचा इशारा दिला आहे.






