फोटो सौजन्य- सोशल मीडिया
महाराष्ट्र विधानसभेसाठी ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना टपाली मतदान पथकामार्फत गृह टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेत मुंबई शहर जिल्ह्यात १९२२ ज्येष्ठ नागरिक व १८७ दिव्यांग अशा एकूण २१०९ मतदारांनी आतापर्यंत गृह टपाली मतदान केले आहे.
मुंबई शहर जिल्ह्यात १३ नोव्हेंबरपासून ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांच्या गृह टपाली मतदानाला प्रारंभ करण्यात आला आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील २१३९ ज्येष्ठ नागरिक मतदार व २१७ दिव्यांग मतदार गृह टपाली मतदानासाठी पात्र ठरले आहेत. उद्या दि. १६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत गृह टपाली मतदान घेतले जाणार आहे.