कोल्ड कॉफीमध्ये आढळलं झुरळ, मालाडच्या प्रतिष्ठित हॉटेलमधील घटना; हॉटेल मालकाविरोधात गुन्हा दाखल (फोटौ सौजन्य - X)
मालाडमध्ये पुन्हा एकदा हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या हलर्गजीपणामुळे ग्राहकांना मनस्तापाला सामोर जावं लागलं आहे. काही महिन्यांपूर्वी मालाडमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. ज्यामध्ये एका ग्राहकाला आईस्क्रीममध्ये मानवी बोट आढळलं होतं. या घटनेचा तपास करण्यात आल्यानंतर समजलं की हे बोट कंपनीतील कर्मचाऱ्याचं होतं. या घटनेनंतर आता मालाडमध्ये पुन्हा एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मालाडमधील एका प्रतिष्ठित हॉटेलमध्ये ग्राहकाला त्याने ऑर्डर केलेल्या कोल्ड कॉफीमध्ये मृत झुरळ आढळलं आहे. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत हॉटेल व्यवस्थापक, वेटर व संबंधित कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेदेखील वाचा- दलित समाज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरां विरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट; नवी मुंबईतील युट्युबर विरोधात गुन्हा दाखल
ही घटना 30 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास घडली आहे. 25 वर्षीय प्रतिक रावत त्याच्या मित्रांसोबत मालाड पश्चिमच्या इन्फिनिटी मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या लाउंजमध्ये गेला होता. त्यांनी तिथे दोन कोल्ड कॉफी ऑर्डर केल्या. वेटरने त्यांना कॉफी आणून दिल्या. मात्र कॉफी पिल्यानंतर त्याची चव नेहमीप्रमाणे नव्हते. त्यामुळे प्रतिकने वेटरला कॉफीमध्ये स्वीट टाकून आणायला सांगितलं. वेटरने त्यांच्या कॉफीमध्ये स्वीट टाकून त्यांना कॉफी परत आणून दिली. मात्र कॉफी पीत असतानाच प्रतिकला त्या कॉफीमध्ये मृत झूरळ असल्याचं आढळलं. प्रतिकने त्याचा फोटो आणि व्हीडिओ काढला. त्यानंतर त्याने तात्काळ वेटरला आवाज देऊन ही घटना सांगितली. मात्र हॉटेल व्यवस्थापक आणि वेटरने ही बाब मान्य केली नाही.
यानंतर प्रतिकने पोलीस स्टेशन गाठत हॉटेल व्यवस्थापक आणि वेटरविरोधात तक्रार दाखल केली. प्रतिककडे असणाऱ्या फोटो आणि व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी व्यवस्थापक, वेटर व संबंधित कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकारानंतर मालाड पोलिस अॅक्शन मोडवर गेले. त्यांनी हॉटेल मॅनेजर, वेटर आणि अन्य संबंधितांवर कलम 125,274,275 आणि 3 (5) अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती देण्यात आली आहे.
हेदेखील वाचा- इमारतीत जाण्यास नकार दिल्याने सुरक्षा रक्षकाला मारहाण; जिम ट्रेनरला अटक, मुंबईतील घटना
मालाड येथील ऑर्लेम ब्रेडन सेराओ या 27 वर्षीय डॉक्टरने 12 जून रोजी एका फूड डिलव्हरी अॅपवरुन आईस्क्रीम कोन ऑर्डर केला होता. मात्र जेव्हा सेराओ यांनी तो कोन उघडला त्यामध्ये त्यांना मानवी बोट आढळलं. हे बोट दोन सेंटीमीटर लांब होतं. त्यांनी याबाबत सोशल मिडीयावर पोस्ट केली. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर आईस्क्रीममध्ये सापडलेलं बोट कोणाचं आहे याचा तपास पोलिसांनी सुरु केला.
आईस्क्रीम कंपनीचा ब्रॅण्ड, या आईस्क्रीम कुठे बनवल्या जातात याचा माग काढत पोलीस थेट पुण्याला पोहचले. यानंतर आईस्क्रीममध्ये सापडेलं बोट आईस्क्रिम कारखानातल्या असिस्टंट मॅनेजरचंअसल्याचं समोर आलं . पॅकेजिंग करताना हा अपघात झाला होता. कारखान्यात काम करणाऱ्या 24 वर्षीय अस्टिटंट मॅनेजरचं हे बोट आहे. मशीन सुरु होती आणि त्यावेळी तो मशीनचं झाकण उघडण्याचा प्रयत्न करत असताना त्याचं बोट तुटलं गेलं.