मुंबईत ऐन उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीर होणार : आदित्य ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
वॉटर टॅंकर एसोसिएशनने भर उन्हाळ्यात संप पुकारला आहे. त्यामुळे मुंबईत पाण्याची समस्या आणखी गंभीर बनणार आहे, अशी माहिती शिवसेना (ठाकरे गट) युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिली असून सरकारने याकडे तातडीने लक्ष द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. मातोश्रीवर आज पत्रकार परिषद बोलवण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
एकनाथ शिंदे यांना कामाव्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टी आवडत नाहीत…; शिंदेंच्या नेत्यांनी स्पष्टच सांगितलं
मुंबईसाठी पाण्याचा विषय महत्त्वाचा आहे. वॉटर टॅंकर एसोसिएशनकडून मुंबईत मॉल, हॉटलेल्स, बांधकाम आणि पाण्याचा तुटवडा असणाऱ्या ठिकाणी पाणी पुरवठा पाणी पुरवठा केला जातो. मात्र असोसिएशनने एक आठवड्यापूर्वी संप पुकारलेला आहे. हा संप काही नवीन नाही, मात्र हा संप सुरू राहिला तर मुंबईत ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मागच्या सरकारच्या काळात त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र त्या अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव जातो की नाही माहिती नाही. मात्र सरकारने यावर तातडीने निर्णय घ्यावा, कारण मुंबईकरांनी हा त्रास आणखी किती दिवस सहन करावा हा प्रश्न आहे. गेल्या सहा सात महिन्यांपासून मुंबईत पाण्याचा प्रश्न तर आहेच, पण रस्त्यांची काम सुरू असताना अनेक पाईपलाईनचं नुकसान झालं आहे. त्यामुळे पाणी वाया जात आहे. शिवाय नळाला गढूळ पाणी येत आहे.
एसटी कर्मचाऱ्याचा मार्चचा पगार केवळ ५६ टक्के देण्यात आला. अनेक कोटींचे पैसे यांनी जमा केले. काही महिन्यांपूर्वी BMC कर्मचाऱ्यांचा पगार आला नाही. एसटी कर्मचाऱ्यांना फक्त 56 टक्के पगार आला. पुढील काही दिवसांत पगार द्यायला पैसे नसतील. जेव्हा मविआचे सरकार असताना जे लोक एसटी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर आणत होते ते आज कुठे दिसत नाहीत, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.