ऑक्टोबरमध्ये उडणार महापालिका निवडणुकांचा बार? किती टप्प्यात होणार निवडणुका?
मुंबई / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले असून, बहुमताचा आकडाही पार केला आहे. या विजयानंतर भाजपने आनंद व्यक्त केला आहे. त्यातच भाजपचे अनेक नेते या विजयावर भाष्य करत आहेत. त्यात मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटले की, ‘महाराष्ट्र जिंकलाच आज राजधानी दिल्ली पण जिंकली आता आर्थिक राजधानीतही मुंबईकर असाच बदल घडवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेली २५ वर्षे पालिकेत भ्रष्टाचार करणाऱ्यांना घरी बसवणार अशा शब्दांत मंत्री तथा मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला आहे. अचानक उगवलेल्या राजकीय बांडगूळाला दिल्लीकरांनी फटकारल्याचे सांगून आशिष शेलार म्हणाले, सामान्य, कष्टकरी दिल्लीकरांचा श्मफलरने गळा घोटणाऱ्या. फसवणाऱ्या आणि लुटेरे, संधीसाधू राजनीतीची साफसफाई करुन दिल्लीकरांनी श्झाडूलार सत्तेबाहेर फेकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत राष्ट्रवादी विचारधारे बाजूने राजधानीने दणदणीत कौल दिला आहे.
ईव्हीएमला दोष देत अपयश झाकण्याचा कार्यक्रम
राहुल गांधी यांच्या काँग्रेसला तर मोठा भोपळा देऊन दिल्लीकरांनी त्यांना जागा दाखवली आहे. ईव्हीएमला दोष देत आपले अपयश झाकण्याचा कार्यक्रम आता अजून जोरात करा असा टोलाही त्यांनी लगावला.
…तरच त्यांचा पक्ष टिकू शकेल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या विजयावर म्हणाले की, “राहुल गांधी यांनी आपल्या पराभवाच्या कारणांचा शोध घेतला तरच त्यांचा पक्ष टिकून राहू शकेल. मात्र, ते केवळ बहाणेच शोधत राहिले तर आगामी काळात काँग्रेसची अवस्था आणखी बिकट झाल्याशिवाय राहणार नाही. विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला मिळालेल्या मतांमध्ये तब्बल एक कोटी मतांचा फरक असल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली.
भाजपबद्दल अनेक ‘फेक नरेटिव्ह’ मतदारांमध्ये पसरवली
‘लोकसभा निवडणुकीत भाजपची लढाई या अराजकतावादी संघटनांशी होती. त्यांनीच भाजपबद्दल अनेक ‘फेक नरेटिव्ह’ मतदारांमध्ये पसरवली. त्याला तोडीस तोड उत्तर देण्यात आम्ही कमी पडलो. विधानसभा निवडणुकीत मात्र अशा अपप्रचाराला सडेतोड उत्तर देण्याची यंत्रणा संघ परिवारातच असल्याचे लक्षात घेऊन आम्ही संघ परिवारातील विविध संस्था संघटनांच्या सहकार्याने उत्तम कामगिरी करू शकलो, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.