'माळेगाव'च्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच अजित पवारांची 'मेगा मीटिंग'; सर्व कामकाजासह कारखान्याच्या स्थितीची घेतली माहिती (Photo Credit- Social Media)
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा कधीच आपल्या भाषणाचा भाग नव्हता, असे स्पष्ट करत राजकीय चर्चेला उधाण आणले आहे. त्यांच्या या विधानावर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी महायुतीतील भाजपच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : या महिन्यात वाजणार महापालिका निवडणुकांचं बिगुल? कामाला लागण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
संजय राऊत यांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केल्याचे ठळकपणे नमूद करत अजित पवार यांना लक्ष्य केले. “शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. आता शेतकरी कर्जमाफीचा विषय अजित पवारांच्या भाषणात नव्हता, हे सांगणे म्हणजे शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ करण्यासारखे आहे,” असे राऊत म्हणाले. अजित पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी सरकारवर ताशेरे ओढले. “महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी फक्त आश्वासनांची खैरात केली आहे. शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा अजित पवारांच्या भाषणात नसेल, तर तो महायुतीच्या जाहीरनाम्यात का होता?” असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, राज्यातील शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा नेहमीच संवेदनशील राहिला आहे. अजित पवार यांच्या विधानामुळे विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. संजय राऊत यांच्या टीकेनंतर अजित पवार आणि महायुती सरकारची भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न पुन्हा राजकीय रणधुमाळीचे केंद्रबिंदू बनत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
इंडिया आघाडीला जिवंत ठेवलं नाही तर…
देशामध्ये इंडिया आघाडी नक्कीच राहिल. महाविकास आघाडीही नक्कीच राहिल. जर आम्ही इंडिया आघाडीला जिवंत ठेवलं नाही, तर विरोधक शिल्लक राहणार नाहीत. हे विरोधकांना संपवतील. हे हुकूमशाह आहेत. आमच्यासमोर खूप खतरनाक लोक आहेत. इंडिया आघाडी ही फक्त लोकसभा निवडणुकांसाठीच बनवली होती. पण आता ती तशीच कायम ठेवणं देशाची गरज आहे. लोकशाहीची गरज आहे.
दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार
दिल्लीत विधानसभा निवडणुका होतात. काँग्रेस आणि आप हे एकत्र लढले होते. त्यांची एकही जागा निवडून आली नाही. जर बसून या गोष्टी चर्चेने संपल्या असत्या तर आम्हालाही आनंद वाटला असता. महाराष्ट्रातही आम्ही ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्या आम्ही स्वबळावर लढू असे सांगितले आहे. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला युती करणं कठीण असते.
हेदेखील वाचा : Pune News: शिक्षण संस्थांची गळचेपी सुरू असताना सरकार गप्प का? ‘या’ प्रकरणात राजीव गांधी स्मारक समिती आक्रमक