Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘देशाच्या सर्वांगीण विकासासाठी…’; हिंदी पत्रकारितेच्या 200 व्या वर्षपूर्ती सोहळ्यात काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास ज्ञान अधिक प्रभावीपणे आत्मसात करता येते. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मातृभाषेला प्राधान्य देण्याचे धोरण देशाच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 01, 2026 | 09:22 PM
‘देशाच्या सर्वांगीण विकासासाठी…’; हिंदी पत्रकारितेच्या 200 व्या वर्षपूर्ती सोहळ्यात काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Follow Us
Follow Us:

हिंदी ही तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा – ब्रजेश पाठक
माध्यमांच्या विस्तारामुळे माहिती बदलले प्रसारणाचे स्वरूप
पत्रकारितेच्या माध्यमातून राष्ट्रभावना जागृत ठेवण्याचे कार्य

मुंबई: मातृभाषा आणि भारतीय भाषांमधून ज्ञान, संस्कृती व मूल्यांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचतो. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी मातृभाषेतील शिक्षण, भारतीय भाषांचे संवर्धन आणि मूल्याधिष्ठित पत्रकारिता यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हिंदी पत्रकारितेचा इतिहास समृद्ध असून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात जनजागृती घडवून आणण्यामध्ये तिचे मोठे योगदान राहिले आहे. ‘उदन्त मार्तण्ड’ या पहिल्या हिंदी वृत्तपत्रापासून सुरू झालेल्या प्रवासाने देशातील सामाजिक आणि राष्ट्रीय विचारप्रवाहाला दिशा दिली. स्वातंत्र्यलढ्यातील अनेक नेत्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून राष्ट्रभावना जागृत ठेवण्याचे कार्य केले.

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यातील सांस्कृतिक व ऐतिहासिक संबंधांचा उल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ज्ञान, परंपरा आणि संस्कृतीच्या माध्यमातून दोन्ही राज्यांमध्ये शतकानुशतके दृढ संबंध राहिले आहेत. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषा संस्कृत परंपरेतून विकसित झालेल्या असून देवनागरी लिपीमुळे त्यांच्यात नैसर्गिक जवळीक आहे. भारतीय भाषांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, जगातील बहुतांश विकसित राष्ट्रांमध्ये मातृभाषेतून शिक्षण दिले जाते.

इंधन संकटावर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा; “पेट्रोल-डिझेलची साठेबाजी खपवून घेणार नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका!”

मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास ज्ञान अधिक प्रभावीपणे आत्मसात करता येते. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मातृभाषेला प्राधान्य देण्याचे धोरण देशाच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेबरोबरच इतर भारतीय भाषांचेही ज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी केले.

पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल आणि सामाजिक माध्यमांच्या विस्तारामुळे माहिती प्रसारणाचे स्वरूप बदलले आहे. तथापि, कोणती बातमी किती वेगाने प्रसारित झाली यापेक्षा तिची सत्यता आणि विश्वासार्हता अधिक महत्त्वाची आहे. लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, समाजजीवनातील मूल्यांचे जतन आणि लोकशाही संस्थांना बळकटी देण्याचे कार्य पत्रकारिता करत असते. बदलत्या काळातही पत्रकारितेने आपल्या मूलभूत मूल्यांचे जतन करीत समाजहिताची भूमिका कायम ठेवावी.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथील हिंदी पत्रकारितेच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त मुंबई हिंदी पत्रकार संघाद्वारे आयोजित 'हिंदी सेवा सन्मान – 2026' कार्यक्रम येथे 'संवाद – हिंदी पत्रकारिता के 200 वर्ष' या स्मरणिकेचे प्रकाशन केले. यावेळी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री… pic.twitter.com/pjpSxJI9OY — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 1, 2026

“येत्या काळात महाराष्ट्र डेटा सेंटर…”; काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी यावेळी हिंदी ही तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असून भाषा सर्वांना जोडण्याचे काम करते, असे सांगितले. मुंबई हिंदी पत्रकार संघाचे महासचिव विजयसिंह कौशिक यांनी प्रास्ताविकात हिंदी पत्रकारितेची २०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुंबई हिंदी पत्रकार संघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून पत्रकार संघाच्या कार्याची माहिती दिली.

Web Title: Cm devendra fadnavis value based journalism plays a crucial role in holistic development nation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 09:22 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Hindi Language
  • Mumbai News

संबंधित बातम्या

आरोग्य व्यवस्था डिजिटल करण्यावर प्रशासनाचा भर! उपतक्रारी, जन्म-मृत्यू नोंदी आणि खरेदी प्रक्रियेवर असणार डॅशबोर्डची नजर
1

आरोग्य व्यवस्था डिजिटल करण्यावर प्रशासनाचा भर! उपतक्रारी, जन्म-मृत्यू नोंदी आणि खरेदी प्रक्रियेवर असणार डॅशबोर्डची नजर

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा
2

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा

Mumbai Ganesh Murti Collapse : गणेशोत्सवाला पुन्हा एकदा गालबोट! कुर्ल्यात स्पीड ब्रेकरवर तोल गेला अन् गणेशमूर्ती रस्त्यावर कोसळली
3

Mumbai Ganesh Murti Collapse : गणेशोत्सवाला पुन्हा एकदा गालबोट! कुर्ल्यात स्पीड ब्रेकरवर तोल गेला अन् गणेशमूर्ती रस्त्यावर कोसळली

Devendra Fadnavis : 2030 पर्यंत जेएनपीटी देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर ठरणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास
4

Devendra Fadnavis : 2030 पर्यंत जेएनपीटी देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर ठरणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.