एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का; पुण्यातील बडा नेता धनुष्यबाण हाती घेणार
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार 2.0 मध्ये पालकमंत्रिपदासाठी सुरू असलेला संघर्ष कायम आहे. मंगळवारी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतही त्याचा परिणाम दिसून आला. रायगड आणि नाशिकचे पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
हेदेखील वाचा : भाजप आणि काँग्रेस; दोन्ही राजकीय पक्षांच्या Bank Balance मध्ये किती फरक? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
सोमवारी त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. परंतु कोणत्याही चर्चेतून त्यांची नाराजी दूर होऊ शकली नाही. यामुळे मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत फारसे निर्णय घेता आले नाहीत, असे सांगण्यात येत आहे. नाशिकमधील शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांना पालकमंत्री व्हायचे होते. पण नाशिकचे पालकमंत्रिपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे असलेले भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले.
त्याचप्रमाणे शिवसेना (शिंदे गट) मंत्री भरत गोगावले यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री व्हायचे होते. पण तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष (अजित पवार) आणि खासदार सुनील तटकरे यांची मुलगी मंत्री आदिती तटकरे यांना पालकमंत्री करण्यात आले.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद
रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद आहे. शिंदे यांच्या नाराजीमुळे फडणवीस यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय तूर्तास पुढे ढकलला. पण पालकमंत्रिपद न मिळाल्याने संतप्त झालेले भरत गोगावले हे सुनील तटकरेंवर उघडपणे हल्लाबोल करत आहेत. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या वादांचे सावट दिसून आले. बैठकीत अटल सेतूवरील टोल वसुलीसह काही मुद्द्यांवरच चर्चा होऊन निर्णय घेता आला.
मंत्रिमंडळ बैठकीला शिंदे अनुपस्थित
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीचे कारण समजेलेले नाही. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा दिवसभर मंत्रालयात आणि राजकीय वर्तुळात रंगली होती. शिंदे दिवसभर त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी होते.
हेदेखील वाचा : “अजून सत्य लपलं असेल तर…”; बाबा सिद्दीकी प्रकरणामध्ये नाव घेतल्यानंतर अनिल परब यांनी दिली पहिली प्रतिक्रिया