अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराज वादग्रस्त विधान केले (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : अजित पवार गटाचे नेते व माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली असून या प्रकरणामध्ये नवीन अपडेट समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांचे बॉलीवुड कनेक्शन असल्यामुळे लॉरेन्स बिश्नोई गॅंगने हा खून केला असल्याचा आरोप करण्यात येत होता. या बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांनी जबाब नोंदवला आहे. यामध्ये त्यांनी भाजप नेते मोहन कंजोब आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे नाव घेतले. यामुळे बाबा सिद्दीकी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांसमोर बाबा सिद्दीक हत्या प्रकरणाबाबत जबाब नोंदवला. यामध्ये त्यांनी अनेक मोठ्या बिल्डर आणि राजकीय नेत्यांची नावे घेतली आहे. यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. बाबा सिद्दीकी यांचे बॉलीवुडमध्ये घनिष्ट संबंध असल्यामुळे आणि सलमान खानसोबत चांगले संबंध असल्यामुळे त्यांची हत्या झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या निशाण्यावर बाबा सिद्दीकी असल्याचे बोलले गेले. या प्रकरणामध्ये पोलिसांनी देखील लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला फरार आरोपी ठरवलं आहे. मात्र झिशान सिद्दीकी यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये लॉरेन्स बिश्नोई याचा कोणताही उल्लेख केलेला नाही.
महाराष्ट्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
झिशान सिद्दीकीने बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे नाव घेतले आहे. यावर आता अनिल परब यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अनिल परब म्हणाले की, “संत ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाच्या बैठकीला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. मी आमदार म्हणून तिथे गेलो होतो. त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने आम्ही तिथे गेलो होतो. या व्यतिरिक्त माझा कुठेही उल्लेख नाही. २४ ऑक्टोबर २०२४ ला स्टेटमेंट दिलंय, त्यावर पोलिसांनी चौकशी केली असेल. पोलिसांच्या चौकशी अंती जे येतं ते आरोपपत्रात दाखल होतं. पूर्ण तपासाअंती आरोपपत्र दाखल केलंय, पोलिसांना जे तपासात आढळलंय ते लिहिलंय. त्यातही झिशान सिद्दिकींचं समाधान झालं नसेल तर त्यांनी सराकरकडे पुन्हा तक्रार करावी, अजून सत्य लपलं असेल तर तपासलं पाहिजे. पोलीस त्यांचे, सरकार त्यांचं आहे, त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे जावं,” अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी दिली आहे.
पुढे ते म्हणाले की, “मला माहिती नाही, यांचे काय व्यवहार आहेत? बाबा सिद्दीकींना मी ओळखायचो. झिशानला सुद्धा ओळखतो. यांचे व्यवहार माहित नाहीत. एखाद्याचा खून होतो, चार-पाच गोष्टी असतात. व्यक्तीगत दुश्मनी, मालमत्तेची भानगड, पैशाची भानगड किंवा बाईवरुन भानगड त्या व्यतिरिक्त खून होण्याचं दुसरं कारण काय?. या हत्येच कारण पोलिसांनी बाहेर आणलं पाहिजे” अशी मागणी अनिल परब यांनी केली आहे.
अनिल परब यांचे नाव बाबा सिद्दीकी प्रकरणामध्ये आल्यानंतर यावर खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. खासदार राऊत म्हणाले की, “याबाबत माझ्याकडे जास्त माहिती नाही. याच्याशी माझा काही जास्त संबंध नाही. झिशान सिद्दिकी यांच्या वडिलांचे निधन झालं आता त्यांनी काय स्टेटमेंट दिलं, पोलिसांची काय भूमिका आहे ते ठरवाव लागेल, मला माहित नाही मला माहिती घ्यावी लागेल. तुम्ही ज्यांची नावं घेत आहात त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय मी मत व्यक्त करणार नाही,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले झिशान सिद्दीकी?
झिशान सिद्दीकी यांनी त्यांचे वडील बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात SRA अँगलने तपास व्हावा, यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तसेच बाबा सिद्दीकी यांचे बिल्डर लाईनमध्ये देखील संबंध असल्यामुळे त्यांनी काही मोठ्या बिल्डर आणि विकासकांची नाव देखील घेतली आहेत. अनिल परब हे एसआरए प्रकल्पात स्वतंत्र बिल्डर आणण्याचा प्रयत्न करत होते. बाबा सिद्दीकी हे डायरी लिहायचे. हत्या झाली त्या दिवशी संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान व्हॉट्स ॲपवरुन त्यांचं मोहित कंबोज यांच्याशी बोलणं झालं होतं. एका बिल्डरच्या पाठपुराव्यासाठी मोहित कंबोज यांना बाबा सिद्दीकी यांना भेटायचं होतं, असा मोठा झिशान सिद्दीकी यांनी केला आहे. त्यांचे चार पानी स्टेटमेंट आहे.