कोण होणार दिल्लीचा मुख्यमंत्री? (फोटो- टीम नवराष्ट्र/सोशल मिडिया)
BJP Chief Minister: दिल्ली विधानसभेत भाजपने जोरदार यश प्राप्त केले. 70 पैकी 48 जागा भाजपने जिंकल्या आहेत. 27 वर्षांनी दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावरून पक्षात चर्चासत्र सुरू आहे. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, दिल्लीत नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 19 फेब्रुवारी रोजो होण्याची शक्यता आहे. 17 किंवा 18 तारखेला पक्षाच्या विधिमंडळ गटाची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट होऊ शकणार आहे.
दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी 70 जागांवर 5 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले होते. 8 तारखेला निकाल जाहीर झाला आणि भाजपने मोठे यश प्राप्त केले. आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांचा जोरदार पराभव झाला. भाजपने 48 तर आपने 22 जागा जिंकल्या. कॉँग्रेसला तर भोपळा देखील फोडता आलेला नाही. अशातच आता दिल्लीच्या मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी कोणाची नावे चर्चेत?
वीरेंद्र सचदेवा
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत दिल्ली भाजप अध्यक्ष रवींद्र सचदेवा यांचेही नाव आहे. भाजपने रवींद्र सचदेवा यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत निवडणूक लढवली आहे. अशा परिस्थितीत जर दिल्लीत भाजप जिंकला तर त्यात वीरेंद्र सचदेवा यांचे मोठे योगदान असेल. पक्षाचे उच्चायुक्त दिल्लीची संपूर्ण कमान त्यांच्याकडे सोपवू शकतात हे स्पष्ट आहे.
स्मृती इराणी
भाजपच्या माजी खासदार आणि स्टार प्रचारक स्मृती इराणी यांनाही दिल्लीत वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळू शकते. लोकसभा निवडणुकीत अमेठीची जागा गमावल्यानंतर, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सध्या कोणतेही मोठे पद भूषवत नाहीत. अशा परिस्थितीत स्मृती इराणी यांना दिल्लीची सूत्रे मिळतील असा अंदाज वर्तवला जात आहे.
मनजिंदर सिंग सिरसा
राजौरी गार्डनमधून भाजपचे उमेदवार असलेले मनजिंदर सिंग सिरसा यांचेही नाव मुख्यमंत्रीपदाच्या यादीत समाविष्ट आहे. मनजिंदर सिंग सिरसा हे दिल्लीपासून पंजाबपर्यंत प्रभावशाली आहेत. अशा परिस्थितीत, सिरसा यांना मुख्यमंत्री बनवून, भाजप केवळ दिल्लीचेच नाही तर पंजाबचे राजकारणही सांभाळू शकते.
दुष्यंत गौतम
दिल्लीच्या करोल बाग विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे दुष्यंत गौतम हे देखील मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारांच्या यादीत आहेत. करोल बाग हे दिल्लीतील लोकप्रिय मतदारसंघांपैकी एक मानले जाते, तर दुष्यंत गौतम हे दलित (एससी) उमेदवार आहेत. अशा परिस्थितीत, त्यांना मुख्यमंत्री बनवून, भाजप दलितांना आपल्या बाजूने घेण्याची रणनीती बनवू शकते.
प्रवेश वर्मांचे नाव अधिक चर्चेत
भाजपने नवी दिल्ली मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध प्रवेश वर्मा यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल आणि संदीप दीक्षित यांचा पराभव केला आहे. दरम्यान दिल्लीचा मुख्यमंत्री प्रवेश वर्मा होऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे. भाजपकडून वरिष्ठ पातळीवर देखील प्रवेश वर्मा यांचा नाव निश्चित केले जाण्याची शक्यता आहे.
नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे परवेश वर्मा हे देखील सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आघाडीवर होते. प्रवेश वर्मा यांचा विजय झाला असून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. प्रवेश वर्मा केजरीवाल यांना पराभूत करण्यात यशस्वी झाले असून मुख्यमंत्रीपदासाठी हा एक मजबूत चेहरा ठरू शकतात. केजरीवाल यांना पराभूत करण्याच्या बदल्यात, भाजप त्यांना मुख्यमंत्री बनवून सर्वात मोठी भेट देऊ शकते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कोणाला पाठिंबा?
दिल्लीमध्ये भाजपच्या विजयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा वाटा असल्याचे म्हटले जात आहे. संघाचे मायक्रो प्लॅनिंग आणि योग्य नियोजन यामुळे दिल्लीत भाजपचा विजय सोपं झाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान प्रवेश वर्मा हेच दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री होतील अशी शक्यता जास्त आहे. प्रवेश वर्मा हे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचे पुत्र आहेत. त्यांनी राजकरणातील संपर्क दांडगा असल्याचे म्हटले जाते.