• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Excellent Performance Of The Medical Ward Under The Office Of Deputy Chief Minister Devendra Fadnavis

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातंर्गत वैद्यकीय कक्षाची उत्कृष्ट कामगिरी

Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील वैद्यकीय कक्षाने सध्या रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करत अनेक रूग्णांना अडचणीच्या काळात मदत केली आहे. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे वैद्यकिय कक्षाचा आलेख उंचावला असल्याचे दिसून येत आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 07, 2024 | 10:38 PM
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील विशेष वैद्यकीय कक्षाची रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील विशेष वैद्यकीय कक्षाची रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील विशेष वैद्यकीय कक्षाने  रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांना त्यांच्या अडचणीच्या काळात मोठी मदत झाली आहे. आरोग्य सेवेचा वसा घेवून गोरगरीब – गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मदत करण्याचे काम हा वैद्यकीय कक्ष करीत आहे. अशा रूग्णांना उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. वैद्यकीय कक्षाचा सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आलेख उंचाविला असून अवघ्या 9 महिन्यात एकूण 13 कोटी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. 

9 महिन्यात कमालीची मदत 

जानेवारी, 2024 पासून ते सप्टेंबर 2024 पर्यंत कक्षाच्या माध्यमातून 418 रुग्णांना मदत झाली आहे. ह्रदय रोग, कर्करोग, यकृत प्रत्यारोपण, मुत्रपिंड प्रत्यारोपण, बोनमॅरो ट्रान्सप्लांट, फुफुसाचे आजार, अस्थिरोग अवयव पुर्नस्थापना शस्त्रक्रिया (Replacement Surgeries), यासारख्या गंभीर व सर्व सामन्यांच्या आवाक्याबाहेर असलेल्या आजारांच्या शस्त्रक्रियेचा समावेश आहे. गोर-गरीब रुग्णांनी धर्मादाय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री मदत ‍कक्षाच्यावतीने करण्यात आले आहे. 

हेदेखील वाचा – राज्यातील गरजू रुग्णांकरिता उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष, वैद्यकीय सहायता हेल्पलाईनचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन!

दुर्बल माणसांवर उपचार

निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांवर मोफत व सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार मिळण्याकरिता उच्च न्यायालय, मुंबई यांनी योजना तयार केली आहे. त्यानुसार, प्रत्येक धर्मादाय रूग्णालयाने त्यांच्या रूग्णालयातील एकूण खाटांपैकी 10 टक्के खाटा निर्धन रूग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी व  10 टक्के खाटा दुर्बल घटकातील रूग्णांवर सवलतीच्या दराने उपचार करण्यासाठी राखून ठेवणे या धर्मादाय रूग्णालयांना बंधनकारक आहे.  या योजनेची प्रभावी व पारदर्शी अंमलबाजावणी होत नसल्याने गोर-गरीब रुग्णांना त्याचा लाभ मिळत नसल्याचे निदर्शनास आले होते.  

त्याचाच भाग म्हणून शासनाच्या 31.10.1023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयांतर्गत राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. योजनेकरीता सुरु केलेल्या ऑनलाईन प्रणालीचे उद्घाटन २ ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले आहे. तसेच रुग्णांच्या २४ तास सहाय्याकरिता उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. नागरिकांनी १८०० १२३ २२११ या संपर्क क्रमांकावर आणि https://charitymedicalhelpdesk.maharashtra.gov.in/ या संकेत स्थळाला भेट दिल्यावर राज्यातील धर्मादाय रुग्णालये, त्यांच्याकडील राखीव बेडची संख्या यांची माहिती मिळणार आहे.

राज्यात धर्मादाय अंतर्गत सुमारे 468 रुग्णालये नोंदणीकृत असून त्यामधील सुमारे 12 हजार बेड्स निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांकरिता उपलब्ध आहेत. यामध्ये कोकीळाबेन, मुंबई, एन.एन रिलायन्स, मुंबई, सह्याद्री हॉस्पिटल, पुणे, दिनानाथ मंगेशकर रुग्णालय, पुणे इत्यादी नामांकित रुग्णालयांचा समावेश असून सर्वधर्मादाय योजनेची अधिक प्रभावी अंमलबाजवणी कशी करता येईल यासाठी कक्षामार्फत मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर येथे विभागीय कार्यशाळेचे आयोजनदेखील करण्यात आले होते. या मध्ये राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांनी उत्साहाने सहभाग घेतला. निर्धन रूग्णाकरीता वार्षिक उत्पन्न मर्यादा १ लक्ष ८० हजार पर्यंत असून अशा रूग्णांना मोफत उपचा, तर १.८० लाख ते ३.६० लाख या वार्षिक उत्पन्न दरम्यान गरीब रूग्णांसाठी ५० टक्के सवलतीच्या दरात उपचार करण्यात येतात. 

हेदेखील वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशीलतेचा पुन्हा प्रत्यय, ४०,००० हून अधिक गंभीर रुग्णांचे वाचले प्राण

गोरगरिबांकरिता योजना

केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या विविध योजना यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर या धर्मादाय योजनेस उपचाराच्या खर्चाची कोणतीही मर्यादा नसल्याने कॅन्सर, लिव्हर ट्रान्सप्लांट, हृदय प्रत्यारोपण अशा महागड्या शस्त्रक्रिया या योजनेतून निर्धन गटातील रुग्णास मोफत करण्यात येतात. त्यामुळे गोर-गरीब रुग्णांकरीता ही योजना वरदान ठरली आहे.    

सद्यस्थितीत कक्षाचे कामकाज ऑफलाईन पद्धतीने सरु असून निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना मदती मिळणे राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षास अर्जासह कागदपत्रे charityhelp.dcmo@maharashtra. gov.in या ईमेल आयडी वर मेल करु शकतात किंवा प्रत्यक्ष कक्षात आणून देऊ शकतात. धर्मादाय रूग्णालयातील बेड मिळण्याकरिता रूग्णास त्याचा, नातेवाईकांचा अर्ज, लोकप्रतिनिधींचे पत्र, आधार कार्ड / ओळखपत्र,  रेशनकार्ड/ तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला,   डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन आवश्यक आहे. राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यरत योजनेचा लाभ घेण्याकरीता निर्धन व दुर्बल रूग्णांनी लाभ घेण्यात यावा, असे आवाहन कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.  

धर्मादाय रूग्णालयातील बेड मिळण्याकरिता रूग्णास आवश्यक कागदपत्रे

रूग्णाचा/ नातेवाईकांचा अर्ज/ लोकप्रतिनीधींचे पत्र, आधार कार्ड / ओळखपत्र, रेशनकार्ड / तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला/ असल्यास पॅनकार्ड, डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन.

Web Title: Excellent performance of the medical ward under the office of deputy chief minister devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 10:38 PM

Topics:  

  • BJP Devendra Fadnavis
  • DCM Devendra Fadnavis

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पुणे जिल्ह्यामध्ये ‘सोमेश्वर’ने फोडली पहिल्या हफ्त्याची कोंडी; 3300 रुपये प्रति टन पहिला हफ्ता जाहीर

पुणे जिल्ह्यामध्ये ‘सोमेश्वर’ने फोडली पहिल्या हफ्त्याची कोंडी; 3300 रुपये प्रति टन पहिला हफ्ता जाहीर

Nov 26, 2025 | 07:50 AM
Russia-Ukraine War : रशिया-युक्रेनमधील युद्धाला आता लवकरच मिळणार पूर्णविराम; डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘हा’ प्रयत्न येणार कामी?

Russia-Ukraine War : रशिया-युक्रेनमधील युद्धाला आता लवकरच मिळणार पूर्णविराम; डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘हा’ प्रयत्न येणार कामी?

Nov 26, 2025 | 07:11 AM
संधिवातामुळे हातपाय वाकडे होतात? हाडांमध्ये साचून राहिलेले Uric Acid बाहेर काढून टाकण्यासाठी ‘या’ भाज्यांचे करा सेवन

संधिवातामुळे हातपाय वाकडे होतात? हाडांमध्ये साचून राहिलेले Uric Acid बाहेर काढून टाकण्यासाठी ‘या’ भाज्यांचे करा सेवन

Nov 26, 2025 | 05:30 AM
‘हे’ जास्त खाल तर ‘या’ अवयवांचा बळी जाईल! कशासाठी काय घातक? योग्य सेवन, निरोगी जीवन

‘हे’ जास्त खाल तर ‘या’ अवयवांचा बळी जाईल! कशासाठी काय घातक? योग्य सेवन, निरोगी जीवन

Nov 26, 2025 | 04:15 AM
Pune News: पीएमपीʼला आळंदी बसआगारासाठी एसटी महामंडळाकडून ४ एकर जागा

Pune News: पीएमपीʼला आळंदी बसआगारासाठी एसटी महामंडळाकडून ४ एकर जागा

Nov 26, 2025 | 02:35 AM
पंतप्रधान मोदींनी हवेत फिरवला मफलर; विजयाच्या उत्साह आणि आनंदाला आले भरते

पंतप्रधान मोदींनी हवेत फिरवला मफलर; विजयाच्या उत्साह आणि आनंदाला आले भरते

Nov 26, 2025 | 01:15 AM
लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला पळविले; फुरसूंगी पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला पळविले; फुरसूंगी पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

Nov 26, 2025 | 12:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याण अर्णव खैरे मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी

Kalyan : कल्याण अर्णव खैरे मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी

Nov 25, 2025 | 01:25 PM
Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

Nov 25, 2025 | 01:21 PM
Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Nov 25, 2025 | 01:17 PM
CHIPLUN : सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवूनच मैदानात, शिवसेना उबाठा उमेदवारांचा निर्धार

CHIPLUN : सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवूनच मैदानात, शिवसेना उबाठा उमेदवारांचा निर्धार

Nov 25, 2025 | 01:12 PM
NILESH RANE : भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा निलेश राणेंचा आरोप

NILESH RANE : भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा निलेश राणेंचा आरोप

Nov 25, 2025 | 01:07 PM
Satara : अपक्ष उमेदवाराने दोन्ही राजेंचे लावले फोटो, शिवेंद्रराजेंनी आयोगाकडे तक्रारीचा दिला इशारा

Satara : अपक्ष उमेदवाराने दोन्ही राजेंचे लावले फोटो, शिवेंद्रराजेंनी आयोगाकडे तक्रारीचा दिला इशारा

Nov 24, 2025 | 11:31 PM
Pune Aundh Leopard : औंधमध्ये दिसला बिबट्या; काय आहे वनविभागाचे स्पष्टीकरण

Pune Aundh Leopard : औंधमध्ये दिसला बिबट्या; काय आहे वनविभागाचे स्पष्टीकरण

Nov 24, 2025 | 11:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.