मुंबई : वांद्रे परिसरातील एका ५ मजली इमारतीचा भाग कोसळून ढिगाऱ्याखाली ५ लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी बचावकार्य सुरू केले केले. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका बचावकार्यासाठी दाखल झाल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबद्दलची माहिती दिली आहे.
वांद्रे पूर्व परिसरातल्या बेहराम नगरमधली एक पाच मजली इमारत आज कोसळली. याबद्दलची माहिती मिळतात महापालिकेने घटनास्थळी पोहोचून बचावकार्याला सुरूवात केली. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या, ६ रुग्णवाहिका घटनास्थळी बचावकार्यासाठी दाखल झाल्या आहेत.
जी इमारत कोसळली आहे ती खूप जुनी होती. तसेच ती इमारत बेकायदेशीर होती. तिला मुंबई महापालिकेकडून नोटीसही देण्यात आली होती, अशी माहिती आता समोर येत आहे. पण तरीही काही कुटुंब त्या इमारतीत वास्तव्यास होते. संबंधित घटना घडली तेव्हा परिसरात मोठा आवाज आला. त्यानंतर स्थानिकांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु केले. तसेच प्रशासनाला तातडीने या घटनेची माहिती देण्यात आली. अग्निमशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झालं. दुर्घटनेत बाधित असलेल्यांना बचावण्याचं युद्ध पातळीवर काम सुरु आहे.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ६ जणांची सुटका करण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले असून या ६ पैकी २ पुरुष आणि २ महिलांना व्ही. एन. देसाई रुग्णालय आणि १ पुरुष आणि एका महिलेला वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे बचावकार्य अजूनही सुरू आहे.