फोटो सौजन्य सोशल मीडिया
चेंबूर येथील होमलेनच्या नव्या एक्स्पिरियन्स सेंटरचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाचे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अणुशक्तीनगरच्या आमदार सना मलिक शेख आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाचे माजी कॅबिनेट मंत्री नवाब मलिक, होमलेनचे वरिष्ठ अधिकारी आणि व्यावसायिक भागीदारांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली. आर्किटेक्ट नम्रता हेगडे यांच्या भागीदारीत हे केंद्र फ्रेंचायजी-ओन्ड, फ्रेंचायजी-ऑपरेटेड (FOFO) मॉडेलअंतर्गत सुरू करण्यात आले आहे.
नव्या स्टुडिओमध्ये ग्राहकांना मॉड्युलर किचन, वॉर्डरोब्स आणि संपूर्ण घरासाठी विविध इंटिरिअर सोल्यूशन्सचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. कंपनीच्या ‘स्पेसक्राफ्ट’ या पेटंट-प्राप्त एआय-सक्षम प्लॅटफॉर्मच्या मदतीने ग्राहकांना घराचे ३डी डिझाइन आधीच पाहता येईल. त्याचबरोबर खर्चाचा अंदाज आणि किंमत रचनेतील पारदर्शकताही उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रकल्प ४५ दिवसांत पूर्ण करण्याची हमी, १० वर्षांची मटेरियल वॉरंटी आणि संपूर्ण प्रकल्प व्यवस्थापनाची सुविधाही कंपनी देत आहे.
होमलेनचे सह-संस्थापक आणि सीओओ तनुज चौधरी यांनी मुंबईतील चौथ्या स्टुडिओमुळे स्थानिक ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञान आणि पारदर्शक सेवांचा लाभ मिळेल, असे सांगितले. तर भागीदार आर्किटेक्ट नम्रता हेगडे यांनी चेंबूरचा निवासी परिसर म्हणून झालेला विकास अधोरेखित केला.
ग्राहकांना डिझाइनपासून अंतिम हस्तांतरणापर्यंत त्रासमुक्त अनुभव देण्यावर भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, FOFO मॉडेलच्या माध्यमातून नेटवर्क वाढवण्याची कंपनीची योजना असून, चालू वर्षात देशभरात १०० नवीन स्टुडिओ सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.






