Lalbaugcha Raja Visarjan 2025 (Photo Credit- X)
Lalbaugcha Raja Visarjan 2025: गिरगाव चौपाटी येथील यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत एक अनोखी घटना घडली आहे. रविवारी, समुद्रातील उंच लाटा आणि तांत्रिक अडचणींमुळे नवसाला पावणारा लालबागच्या राजाच्या मूर्तीचे विसर्जन नियोजित वेळेत होऊ शकले नाही. लालबागच्या राजाच्या विसर्जन इतिहासात अशी घटना प्रथमच घडली आहे, जिथे बाप्पाला इतका वेळ समुद्रात थांबावे लागले.
दरवर्षीप्रमाणे, दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे सकाळी ९ वाजण्यापूर्वी लालबागचा राजाच्या मूर्तीचे खोल समुद्रात विसर्जन करण्याची तयारी सुरू होती. मात्र, रविवारी सकाळी आलेल्या समुद्रातील जोरदार भरतीमुळे आणि विसर्जनासाठी वापरल्या जाणाऱ्या नवीन तराफ्याच्या तांत्रिक अडचणींमुळे मूर्तीला तराफ्यावर चढवणे कठीण झाले. यामुळे, गेल्या साडेसहा तासांपासून लालबागचा राजाची मूर्ती समुद्रातच होती.
The immersion of Lalbaugcha Raja faced an unexpected delay due to high tides, leaving the idol unimmersed even after 24 hours.
The murti, which left the pandal on Saturday afternoon, reached the immersion site at Chowpatty around 8 a.m. on Sunday.
📸: @khanshadab1982… pic.twitter.com/uVOC9Kt3tn
— Mid Day (@mid_day) September 7, 2025
सकाळी साडेनऊ वाजल्यापासून लालबागच्या राजाला तराफ्यावर चढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत. समुद्राला आलेल्या भरतीमुळे लालबागच्या राजाच्या मूर्तीचा अर्धा भाग पाण्यात बुडाला होता, ज्यामुळे गणेशभक्तांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. यापूर्वी, लालबागचा राजाचा पाट जड झाल्याचा असा प्रकार कधीही घडला नव्हता, ज्यामुळे ही परिस्थिती सर्वांसाठी अनपेक्षित होती.
सध्या कोळी बांधव आणि लालबागच्या राजाचे कार्यकर्ते मूर्तीला तराफ्यावर चढवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आता समुद्रातील भरती कमी झाल्यावर म्हणजेच दुपारी ३ नंतर बाप्पाचे विसर्जन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. हायटाईड (High Tide) कमी झाल्यानंतर मूर्तीला पुन्हा तराफ्यावर चढवले जाईल आणि मग विसर्जन पूर्ण केले जाईल. ही घटना लालबागचा राजा आणि गणेशोत्सव प्रेमींसाठी एक अविस्मरणीय क्षण ठरली आहे.
शुक्रवारी सकाळी लालबागच्या राजा येथील मुख्य प्रवेशद्वारासमोर मोठा अपघात झाला. एका अज्ञात वाहनाने दोन मुलांना धडक दिली. दोघेही गंभीररित्या चिरडले गेले. या अपघातात एका दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. तिच्या ११ वर्षांच्या भावाला गंभीर दुखापत झाली आहे आणि त्याला परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.