local train (फोटो सौजन्य - PINTEREST)
मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईकरांची लाईफलाईन मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे, तसेच अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. दरम्यान अनेक एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
Mumbai Local: लोकल प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उचलण्यात आलेल्या ‘या’ पावलामुळे प्रवास होणार सुखकर
मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेसेवेवर आज (२७ एप्रिल) मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम या तीनही प्रमुख उपनगरी रेल्वेमार्गांवर रेल्वे प्रशासनाकडून देखभाल व तांत्रिक कामांसाठी विशेष ब्लॉक घेतला गेला आहे. यामुळे अनेक लोकल व एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून, काही गाड्या थेट रद्द करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेचे वेळापत्रक काय?
विद्याविहार ते ठाणे या मार्गावर, सकाळी ८ ते दुपारी १२.३० दरम्यान, रेल्वे रचना व सिग्नल प्रणालीसाठी विशेष देखभाल कामं सुरू आहेत. यामुळे अप व डाऊन मार्गावरील जलद गाड्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवर वळवण्यात आल्या आहेत. या कालावधीत काही गाड्यांना १० ते १५ मिनिटांचा उशीर होण्याची शक्यता रेल्वे विभागाने व्यक्त केली आहे.
या ब्लॉक कालावधीत डाऊन मेल / एक्स्प्रेस विद्याविहार स्थानकात येथे डाऊन जलद मार्गावर वळविल्या जातील. तर ठाणे स्थानकात पाचव्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. अप मेल-एक्स्प्रेस ठाणे स्थानकात अप जलदमार्गावर वळविल्या जातील आणि विद्याविहारजवळ सहाव्या मार्गावर पुन्हा वळविल्या जातील.या ब्लॉकमुळे ठाणे आणि डोंबिवली/बदलापूरहून मुंबईकडे येणाऱ्या उपनगरीय गाड्या ठाणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वरून सुटतील.
हार्बर रेल्वेचे वेळापत्रक काय?
हार्बर मार्गावरही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रे/पनवेल दरम्यान सकाळ ११ वाजल्यापासून ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत गाड्यांची वाहतूक थांबवण्यात आली आहे. या काळात प्रवाशांना मुख्य मार्ग किंवा पश्चिम रेल्वेचा पर्यायी वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या मेगाब्लॉक दरम्यान सीएसएमटी मुंबईहून वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणारी डाऊन हार्बर लाईन सेवा सकाळी ११:१६ ते सायंकाळी ४:४७ पर्यंत बंद राहील. तर सीएसएमटी मुंबईहून वांद्रे/गोरेगावच्या दिशेने जाणारी डाउन हार्बर लाईन सेवा सकाळी १०:४८ ते सायंकाळी ४:४३ पर्यंत स्थगित राहील. तसेच पनवेल/बेलापूर/वाशीहून सीएसएमटी मुंबईकडे येणारी अप हार्बर लाईन सेवा सकाळी ९:५३ ते दुपारी ३:२० पर्यंत बंद असेल. त्यासोबतच गोरेगाव/वांद्रेहून सीएसएमटी मुंबईकडे येणारी अप हार्बर लाईन सेवा सकाळी १०:४५ ते सायंकाळी ५:१३ पर्यंत रद्द राहील.
पश्चिम रेल्वेकडून मेगाब्लॉक नाही
पश्चिम रेल्वेने याबाबत अधिकृत ब्लॉक जाहीर केलेला नसला तरी कांदिवली-बोरिवली दरम्यान काही तांत्रिक कामं सुरू असल्याने तिथेही गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना पर्यायी वाहतूक व्यवस्था वापरण्याचा सल्ला दिला असून, या तांत्रिक कामांमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
Mumbai News: ‘सध्याच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे…”; नेमके काय म्हणाले राज्यपाल राधाकृष्णन?