दत्ता गाडेप्रमाणेच 'खाकी'चा गैरवापर वाढण्याची शक्यता, RTO च्या परिपत्रकामुळे खळबळ
मुंबई : स्वारगेट एसटी आगारात २६ वर्षांच्या तरुणीवर बलात्कार करणारा नराधम दत्तात्रय गाडे याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोत दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) हा पोलिसांच्या खाकी गणवेशात दिसत होता. हा गणवेश पोलीस कॉन्स्टेबलचा असल्याची माहिती समोर आली आणि राज्यात एकच खळबळ उडाली होती. आता या खाकी गणवेशाचा गैरवापर राज्यात वाढू शकतो अशी एक धक्कादायक बाब RTOच्या परिपत्रकामुळे समोर आली आहे.
Walmik Karad : तुम्हाला खोटं वाटेल, पण वाल्मिक कराडकडे 15 लाखांच्या खंडणीची मागणी, घाबरलेल्या वाल्मिक दिले पैसेराज्यातील रस्ता सुरक्षा अमंलबजावणी आणि वायूवेग पथकाच्या कंत्राटी वाहन चालकांना आता खाकी गणवेश परिधान करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु, या पथकातील वाहन चालकांना अशा प्रकारे खाकी गणवेश दिल्यामुळे त्याचा गैरवापर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या खाकी गणवेशाचा वापर करून वाहन चालकांना विनाकारण थांबविण्याचा तसेच त्यांच्याकडून बेकायदा वसूली करण्याचा प्रकार वाढण्याची शक्यता आहे. मोटर वाहन कायद्यातील नियमाचा धाक दाखवत तसेच वाहनांचा फोटो काढून मोठ्या दंडाची भीती दाखविण्याचे प्रकारही वाढू शकतात. दत्ता गाडे याने ज्या प्रकारे खाकी गणवेशाचा गैरवापर केला. तसाच या वाहन चालकांकडून होण्याची शक्यता आहे.
सध्या राज्याच्या मोटर वाहन विभागातील भरारी पथकात एकूण २५१ वाहने आहेत. त्यात केवळ ४६ हे नियमित वाहन चालक आहेत. तर थेट कंत्राटी वाहन चालक म्हणून ५३ जणांना आणि बाहेरील यंत्रणेकडून ४४ तर राज्य परिवहन महामंडळातर्फे ४५१ पैकी ३९१ असे एकूण ५३४ वाहन चालक कार्यरत आहेत. या वाहन चालकांचा नागरिकांशी थेट संपर्क येत असल्याचे कारण देऊन त्यांना ओळखपत्र आणि खाकी गणवेश परिधान करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या संदर्भातील २४ फेब्रुवारी रोजी जारी केलेले परिपत्रक नवराष्ट्र ऑनलाइनच्या हाती लागले असून त्यावर महाराष्ट्र परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांची स्वाक्षरी आहे. राज्य मोटर वाहन विभागाचा उद्देश जरी चांगला असला तरी दत्ता गाडे प्रमाणे या खाकी वर्दीचा गैरवापर होऊ शकते अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.
Navi Mumbai News: शिरवणे गावातील लॉजमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात एकच खळबळ
नुकताच असाच एक प्रकार नांदेड येथे घडला. कंत्राटी कामगाराच्या वसुलीला महिला मोटर वाहन निरीक्षकाने विरोध केल्यावर त्या कंत्राटी कामगाराने त्या महिला अधिकाऱ्याला त्रास दिला, खासगी वाहनाकरवी सरकारी वाहनाचा पाठलाग केला. रात्री १च्या सुमारास घराची रेकी केली. या संदर्भात संबंधीत महिला अधिकाऱ्याने पोलीस स्टेशनमध्ये या कंत्राटी कर्मचाऱ्याविरोधात तक्रारही दाखल केली आहे.
कायम सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्यांना आपल्या जबाबदारीचं भान असतं का? हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना खाकी वर्दी आणि परिवहन विभागाचा लोगो वापरण्याची मुभा देणाऱ्या परिवहन विभागाने या संपूर्ण गोष्टींचा बारकाईने विचार करण्याची गरज आहे.