परमबीरसिंगांनी मोहन भागवतांना उचलून आणण्याचे दिले होते आदेश (Photo Credit- Social Media)
ठाणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) संरसंघचालक मोहन भागवत यांचा चार दिवसांचा भिवंडी दौरा आजपासून (24 जानेवारी) सुरू झाला आहे. या दौऱ्यात ते ठाणे जिल्ह्यातील आरएसएच्या स्थानिक शाखांना भेट देणार आहेत. यासोबतच, संघटनेच्या पदादिकाऱ्यांशी ते संवाद साधणार असल्याची महितीसंघाच्या भिवंडी युनिटचे सचिव विजय वल्लाळ यांनी दिली. दौऱ्यादरम्यान, मोहन भागवत कोकण विभागातील अधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत विशेष बैठक घेणार आहेत. तसेच, २६ जानेवारीला स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भिवंडीतील एका महाविद्यालयात ध्वजवंदन कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना संबोधित करतील.
यापूर्वी मोहन भागवत केरळ दौऱ्यावर होते, जिथे त्यांनी दक्षिण केरळ प्रदेशातील संघटनात्मक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. या दौऱ्यात त्यांनी संघाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि संघटनेच्या आगामी योजना ठरवल्या.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या अलीकडील विधानामुळे राजकीय वर्तुळात गोंधळ माजला आहे. 13 जानेवारी रोजी त्यांनी अयोध्येतील राम मंदिर बांधकामावर भाष्य करताना म्हटले होते की, “राम मंदिर उभारणीद्वारे भारताला खरे स्वातंत्र्य मिळाले.” त्यांच्या या विधानावर काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याला देशद्रोहासम मानले असून, हे विधान भारतीयांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही भागवत यांच्या विधानाचा निषेध करताना असे वक्तव्य देशातील सामाजिक वातावरण बिघडवू शकते, असे मत व्यक्त केले.
भागवत यांनी राम मंदिर अभिषेकाच्या संदर्भात हिंदू कॅलेंडरनुसार ‘प्रतिष्ठा द्वादशी’ ही तारीख महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे. अयोध्येतील राम मंदिराचा अभिषेक गेल्या वर्षी 22 जानेवारी 2024 रोजी झाला होता, तर यावर्षी पौष शुक्ल द्वादशी तिथी 11 जानेवारीला आली. या विधानामुळे राजकीय पक्षांमध्ये जोरदार टीका-टिप्पणी सुरू आहे. भागवत यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादावर चर्चेची लाट उसळली आहे.
विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात! वंशज संभाजीराजे छत्रपतींनी घेतला ‘या’वर आक्षेप
दरम्यान, 15 ऑगस्ट 1947 वर केलेल्या विधानामुळे वादंग निर्माण झाला होता. 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकाला एक वर्ष पूर्ण होत आहे. या कालावधीत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणांमध्ये राम मंदिराचा विशेष उल्लेख केला होता. त्यांनी मंदिराच्या अभिषेकाला भारताच्या स्वातंत्र्याशी जोडले. पंतप्रधान मोदी यांनी अभिषेकाचे नेतृत्व केल्यानंतर, आता वर्षभरानंतर यावर पुन्हा चर्चा रंगवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी नुकत्याच एका भाषणात म्हटले, “15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून राजकीय स्वातंत्र्य मिळाले, परंतु त्या काळच्या अपेक्षांनुसार संविधानाचे पालन करण्यात अपयश आले. अनेक शतकांपासून अन्याय सहन करणाऱ्या भारतासाठी अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकाचा दिवस खऱ्या स्वातंत्र्याचा प्रतीक आहे.”