लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; शून्य टक्के व्याजाने 1 लाखापर्यंत कर्ज मिळणार
गेल्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली होती. महाविकास आघाडीचं वारं राज्यात असताना महायुतीला मोठं यश मिळालं. या योजनेंतर्गत लाखो पहिला थेट सरकारशी जोडल्या गेल्या आहेत. दरम्यान आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना १ लाखांपर्यंतच कर्ज मिळणार आहे. ते पण शून्य टक्के व्याजाने कर्ज मिळणार आहे.
आता वृद्ध, विधवा आणि अपंगांना दरमहा मिळणार १,१०० रुपये, काय आहे योजना? जाणून घ्या
या योजनेचा लाभ घेणाऱ्या मुंबईतील महिलांना शून्य टक्के दराने 1 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना मुंबई बँक मदतीचा हात देणार असून शून्य टक्के व्याज दराने कर्जपुरवठा केला जाणार आहे. लाडक्या बहिणींचे पैसे उद्योग-व्यवसायांच्या माध्यमातून बाजारात आले पाहिजे, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. त्यामुळे, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना 9 टक्के व्याजदराने देण्यात येणारं कर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळणार आहे. शासनाच्या 4 महामडंळातील विविध योजनांमधून ही सवलत देण्यात आहे, अशी माहिती मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली.
राज्य सरकारच्या 4 महामंडळाच्या योजनांमधून 12 टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा दिला जातो. पर्यटन महामंडळाची आई योजना आहे. या योजनेतून महिलेला 12 टक्क्यांपर्यंत व्याजाचा परतावा दिला जातो. यासह, भटक्या विमुक्तांसाठीचं महामंडळ, ओबीसी महामंडळ, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांमधून व्याजाचा परतावा महिलांना दिला जातो. ज्या महिलांना कर्जपुरवठा केला जात आहे, त्या लाभार्थी महिला या योजनेत बसत असतील, तर या महिलांना शून्य टक्के व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिलं जाऊ शकतं, असंही त्यांनी म्हटलं आहे.
एका महिलेला 1 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं आणि 5-10 महिला एकत्र येऊन स्वत:चा व्यवसाय करू शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चारही महामंडळाचे संचालक व संबंधित खात्याचे सचिव आणि अतिरिक्त सचिवांसोबत बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी तसे आदेशही दिले आहेत, अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. तसंच स्वयंपूनर्विकास हाऊसिंगचं ज्या पद्धतीने केलं, त्याच पद्धतीने मुंबईतील महिलांना या योजनेचा लाभ मिळेल. 12 ते 13 लाख लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला लाभार्थी असून 1 लाखांच्या आसपास मुंबई बँकेकडे सभासद आहेत, अशी माहिती त्यांन दिली.