फोटो सौजन्य: @MPLodha/X.com
हल्ली अनेक राजकीय नेते जनता दरबार घेताना दिसत आहे. या निमित्ताने अनेक नागरिकांच्या समस्या राजकीय नेत्यांपर्यंत पोहचतात आहे. नवी मुंबईचे गणेश नाईक सुद्धा त्यांच्या जनता दरबारामुळे नेहमी चर्चेत असतात. नुकतेच राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील गोरेगाव येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगरपालिकेच्या गोरेगाव, प. दक्षिण विभाग कार्यालयात जनता दरबार पार पडला. यावेळी बांधकाम, वाहतूक, फेरीवाले, कचरा, सांडपाणी आणि इतर रोजच्या समस्यांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आज थेट आपले प्रश्न मांडण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमात आमदार श्रीमती विद्या ठाकूर यांनीही सहभाग घेतला. तब्बल २०० हून अधिक तक्रारी नागरिकांनी प्रत्यक्षपणे मांडल्या. प्रत्येक तक्रारीवर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले.
जनता दरबारात नागरिकांनी पुढील प्रमुख समस्या मांडल्या:
कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गोरेगाव परिसरातील अवैध लॉज व्यवसायावर तत्काळ कारवाई करण्यासाठी समिती गठीत करण्याचे निर्देश दिले. तसेच, स्थानिक परिसरातील रोहिंग्या व बांग्लादेशी फेरीवाल्यांवर शोध मोहीम राबवून कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या.
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, मुंबई शहरातील प्रत्येक विभागात जनता दरबारांचे आयोजन करण्यात येत आहे, ज्यामुळे नागरिकांच्या तक्रारी थेट मंत्र्यांपर्यंत पोहोचून तत्काळ तोडगा काढता येईल.
कॅबिनेट मंत्री लोढा म्हणाले, “मुंबईकरांच्या अडचणींवर जलद आणि प्रभावी उपाय करणं ही आमची प्राथमिकता आहे. जनता दरबार म्हणजे फक्त ऐकणं नाही, तर तिथेच निर्णय घेऊन लोकांना दिलासा देणं आहे.” या जनता दरबारातून स्पष्ट झाले की, प्रशासन नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ लक्ष देत आहे.