Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा ! १५ मेपासून १० टक्के कपात; पाणीटंचाईचे संकट ओढवणार

मुंबईत १५ मेपासून पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात लागू होणार असून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील काही आठवड्यांत पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 29, 2026 | 01:05 PM
मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा ! १५ मेपासून १० टक्के कपात; पाणीटंचाईचे संकट ओढवणार

मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा ! १५ मेपासून १० टक्के कपात; पाणीटंचाईचे संकट ओढवणार

Follow Us
Follow Us:
  • मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा!
  • १५ मेपासून १० टक्के कपात
  • पाणीटंचाईचे संकट ओढवणार
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्याने तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईकरांवर पाणीटंचाईचे संकट ओढवणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेने येत्या १५ मे पासून संपूर्ण मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण आणि बाष्पीभवन होत असल्याने सद्यस्थितीत या धरणांमध्ये केवळ २७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. पावसाळा लांबणीवर पडल्यास शहराला पाणीटंचाई भासू नये, यासाठी खबरदारी म्हणून पाण्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.

Mumbai: महापौर बंगल्यावरून रणकंदन! २.३९ कोटींच्या प्रस्तावावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

मुंबई महापालिका प्रशासनाचे आवाहन

पावसाळा सुरू होईपर्यंत उपलब्ध पाणीसाठा पुरवून वापरणे आवश्यक आहे.

त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा.

१५ मे पासून ही कपात लागू होणार असल्याने इमारतींमधील टाक्या भरताना किंवा दैनंदिन वापरावेळी मुंबईकरांना नियोजित कपातीचा सामना करावा लागणार आहे, असे पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले.

३,८५०- दशलक्ष लिटर वाष्णीपुरवठा दररोज सात धरणातून
२३७- दशलक्ष लिटर अतिरिक्त पाण्याची गरज.
२७%- सध्याचा पाणी साठा

राज्य सरकारकडे मदतीची धाव

मुंबईची तहान भागवण्यासाठी पालिकेने राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या भातसा आणि वैतरणा चरणांतील राखीव साठबातून २३७ दशलक्ष लिटर पाणी मिळावे, अशी विनंती केली आहे. या संदर्भात पालिकेने सरकारला अधिकृत पत्र पाठवले असून, हा राखीव साता उपलब्ध झाल्यास मुंबईकरांना पाणीकपातीपासून काहीसा दिलासा मिळू शकतो.

तलावांमध्ये केवळ २८ टक्के पाणी, साठा जुलैपर्यंत पुरेल

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये—भटसा, तानसा, मोडकसागर, अप्पर वैतरणा, मिडल वैतरणा, तुळसी आणि विहार—एकत्रितपणे २८.३५ टक्के पाणीसाठा आहे. हे प्रमाण ६ जुलैपर्यंत पुरेसे आहे. भिडे यांनी स्पष्ट केले की, वाढलेले बाष्पीभवन आणि उष्णतेमुळे पाण्याची वाढती मागणी यामुळे परिस्थिती बिकट होत आहे. बीएमसी दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करते, तर मागणी ४,३०० दशलक्ष लिटर आहे.

एल निनोमुळे मान्सूनला धोका

भारतीय हवामान विभागाने (IMD) एल निनो हवामान चक्रामुळे यावर्षी मान्सून सामान्यपेक्षा कमी राहील असा अंदाज वर्तवला आहे. या चक्रामुळे पॅसिफिक महासागरातील पाण्याचे तापमान असामान्यपणे वाढते, ज्याचा परिणाम भारतातील पावसावर होतो. या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, पाणी वाचवण्यासाठी बीएमसीने पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मान्सूनपूर्व आढावा बैठकीनंतर अश्विनी भिडे म्हणाल्या की, पाणी कपात न केल्यास जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाण्याची पातळी संपू शकते.

Mumbai: “कलिंगडमध्ये विष होतं का?”; एकाच कुटुंबाच्या मृत्यूनंतर अबु आझमींचे मुख्यमंत्र्यांना पत्र; केली ‘ही’ मोठा मागणी

Web Title: Mumbai water cut 10 percent from 15 may water shortage alert news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 01:05 PM

Topics:  

  • BMC
  • Mumbai
  • mumbai water cut
  • Water Shortage

संबंधित बातम्या

Mumbai Local: प्रवाशांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष
1

Mumbai Local: प्रवाशांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष

Buldhana News: ५१ प्रकल्पांत ६० टक्के जलसाठा; खरिपासोबतच रब्बीच्याही सिंचनाची काळजी
2

Buldhana News: ५१ प्रकल्पांत ६० टक्के जलसाठा; खरिपासोबतच रब्बीच्याही सिंचनाची काळजी

Mumbai News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! दीड तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत, मढ-वर्सोवा केबल-स्टेड पुलाचा मार्ग मोकळा
3

Mumbai News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! दीड तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत, मढ-वर्सोवा केबल-स्टेड पुलाचा मार्ग मोकळा

Manoj Jarange Patil: ‘मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखल्यास भाजपपासून मतदान दूर गेलेच समजा’; जरांगे पाटलांचा थेट इशारा
4

Manoj Jarange Patil: ‘मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखल्यास भाजपपासून मतदान दूर गेलेच समजा’; जरांगे पाटलांचा थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.