फोटो सौजन्य - Social Media
गणेशउत्सव म्हणजे मुंबईकरांच्या भावनांचा विषय! आणि जेव्हा अनंत चतुर्दशीचा सूर्य उगवतो, गणेश भक्त मुंबईकरांचे कंठ दाटून येते आणि त्यांचे पाऊलखुणा चिंचपोकळी, गिरगाव, लालबाग या ठिकाणी मार्गस्थ होता. आपल्या लाडक्या बापाला निरोप देण्यासाठी यंदाच्या वर्षीही अमाप गर्दी जमली आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी फक्त मुंबईकर नाही तर मेघराज गर्जत आहे. मोठमोठी श्रीमंत मंडळी असू दे किंवा गरिबातील गरीब, सर्व मंडळी अगदी भक्तिभावाने एकत्र येऊन बाप्पाच्या चरणी लाखोंच्या गर्दीत लोटांगण घालत आहे.
मुंबईचे मोठे गणपती अशी ओळख असणारे लालबाग-परळचे गणेशउत्सव मंडळात आज मोठी गजबज आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी मंडळं सज्ज झाली आहेत. लालबागचा राजा जिगाव चौपाटीकडे मार्गस्थ झाला आहे. राजाचे दर्शन घेण्यासाठी भक्तजन लाखोंच्या संख्येत जमली आहेत. मुंबईच्या राजानेही मंडपाच्या बाहेर पाऊल टाकले आहे. लालबाग परळ क्षेत्रातील मोठे गणपती जसे की चिंचपोकळीचा चिंतामणी, तेजुकायाचा राजा, काळाचौकीचा राजा, परळचा राजा, अगदी सगळेच बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
गिरगाव चौपटीवर विसर्जनाची मोठी व्यवस्था करण्यात आली आहे. तर जागोजागी ६ फुटांखालील मुर्त्यांची कुत्रिम तलावाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. गणरायाचे दर्शन घेऊन निरोप देण्यासाठी लाखोंच्या संख्यने भक्तजन गिरगावच्या भव्य सागरासमोर उभे आहेत. अशामध्ये पावसाच्या सरीही मोठ्याने बरसत आहेत, जणू बापाला निरोप देण्यासाठी स्वतः मेघराज आले आहेत.
पुण्यातही मानाच्या ५ बाप्पांना देण्यात येतोय निरोप
गणेशोत्सवाचा आज पुण्यात उत्साहपूर्ण निरोप दिला जात आहे. दहा दिवसांच्या भक्ती आणि आनंदानंतर विसर्जन मिरवणुकीला सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती आणि दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपतींचे विसर्जन पार पडले आहे. त्यानंतर मानाचा तिसरा गुरुजी तालिम गणपतीही विसर्जनासाठी निघाला. चौथा मानाचा तुळशीबाग गणपती अलका चौकात दाखल झाला आहे. पाचवा मानाचा केसरीवाडा गणपती देखील लवकरच विसर्जनासाठी सज्ज आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची मिरवणूक मोठ्या जल्लोषात सुरु आहे. पुण्यनगरीत ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाच्या उधळणीत भक्तीचा माहोल रंगला आहे. हजारो भाविकांनी पारंपरिक पोशाखात बाप्पाला निरोप दिला आहे. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या गजरात पुण्याची रात्र उजळली आहे.