मुंबई : उत्तर प्रदेश मध्ये संपूर्ण भाजपनी ताकद लावली परंतु पंजाबमध्ये भाजपने निवडून येण गरजेचं होतं. परंतु त्यांना पंजाब सारख्या राज्याने का नाकारलं याचं चिंतन त्यांना करावं लागेल असं म्हणात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. अखिलेश सिंग यांचा देखील अभिनंदन करावं लागेल असेही ते म्हणाले.
तुमच्या आनंदात सहभागी आम्ही होऊ. लोकशाही मध्ये निवडणुका होतात पण पंजाब मध्ये मला चिंता वाटते त्या ठिकाणी एखादा राजकीय पक्ष निवडून येणे गरजेचे आहे पंजाब हा पोरखेळ नाही. पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या आधी देखील अशा प्रकारच्या घोषणा केल्या जात होत्या पवार साहेबांनी सांगितलं आहे की आम्ही तयार आहोत अजून काय करणार आहात अजून रेड टाकणारा हात आणखी खोटे गुन्हे दाखल करणार अजून काय करू शकतात झाकी आणि बाकी आम्हाला माहित आहे आम्ही पण तयार आहोत असेही ते म्हणाले.
[read_also content=”निकालानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया ; म्हणाले- ‘भारतासाठीचा निर्णय 2024 मध्ये होईल, कुठल्याही राज्याच्या निकालामुळे नाही” https://www.navarashtra.com/india/prashant-kishors-reaction-after-the-verdict-the-decision-for-india-will-be-taken-in-2024-not-because-of-the-results-of-any-state-nrab-253064.html”]
चुकीच्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणा काम करत आहेत एकाच पक्षाचे एकाच आघाडीचे लोकं टारगेट केले जात आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि बंगाल यावर आपण मत व्यक्त केलं पाहिजे. केंद्रीय तपास यंत्रणा राजकीय दबाव खालीच काम करत आहेत यावर आघाडी ठाम आहे, मी जरी तिथे बोललो आणि दहा मिनिटांनी घरावर माझ्या धाड पडली तरी मी घाबरत नाही. सत्य सांगणे हा दबाव आहे का तर मग सत्य ऐकण्याची देखील तयारी ठेवा.
[read_also content=”रशिया-युक्रेन युद्धाचा 16 वा दिवस; रशियाला कधीही युद्ध नको होतं, रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांचं मोठं वक्तव्य! https://www.navarashtra.com/latest-news/russia-ukraine-war/16th-day-of-russia-ukraine-war-russia-never-wanted-war-says-russian-foreign-minister-nrps-252957.html”]