आकाचा आका शोधला, आता खोक्याचा बोका शोधा : विजय वडेट्टीवार (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई: वर्षा बंगल्यावर जाण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का घाबरत आहेत,तिथे असं का घडलयं की तिथे यापूर्वी काय घडवलं गेलयं का, असे काही प्रश्न ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केले होते. राऊतांच्या या प्रश्नांना उत्तर देत, उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर लिंबू मिरच्या सापडल्या होत्या. असा पलटवार शिंदे गटाचे आमदार रामदास तडस यांनी केला. पण संजय राऊत आणि रामदास तडस यांच्या दाव्यामुळे वर्षा बंगल्यावरील काळ्या जादूच्या चर्चांना उधाण आले आहे.
संजय राऊत आणि रामदास तडस यांच्या या आरोप प्रत्यारोपावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. “उद्धव ठाकरे, रामदास कदम, संजय राऊत किंवा एकनाथ शिंदे हे सर्वजण शिवसेनेतील प्रमुख नेते आहेत. त्यामुळे त्यांना एकमेकांची गुपिते माहित असणे स्वाभाविक आहे आणि काळ्या तसेच पांढऱ्या जादूबाबतही त्यांची जाण असू शकते, असे त्यांनी सूचित केले.
India vs England : जाणून घ्या एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक, वाचा कुठे पाहता येईल लाइव्ह स्ट्रीमिंग
महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेच्या चाळीस आमदारांसह आसाममधील कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर ते मुख्यमंत्री बनले. त्याच वेळेपासून काळ्या जादूबाबत चर्चा सुरू झाली, आणि संजय राऊतांच्या विधानामुळे ती पुन्हा चर्चेत आली. या संदर्भात वडेट्टीवार यांनी टिप्पणी करताना सांगितले की, या नेत्यांना काळ्या आणि पांढऱ्या जादूचे ज्ञान असण्याची शक्यता आहे, त्यामुळेच त्यांना एकमेकांच्या गोष्टी ठाऊक असतील.
गुन्हेगाराला कोणतीही जात किंवा धर्म नसतो. बीड प्रकरणाला जातीय रंग देण्याचा जो प्रयत्न करणे अनुचित आहे. सरकारने या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. प्रत्येक ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी हस्तक्षेप करण्याची गरज नाही. संतोष देशमुख किंवा वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनीही जातीच्या ढाली करणे चुकचे आहे. बीडमधील गुन्हेगारीमुळे संपूर्ण राज्यभर या ठिकाणाचा उल्लेख केला जातो. पूर्वी बिहारला गुन्हेगारीसाठी ओळखले जायचे, आता बीडचीही तशीच प्रतिमा तयार होत असल्याची खंत वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.
C-Voter Survey: केजरीवाल सत्ता राखणार की गमावणार? जनतेचा मूड भाजपच्या…? काय सांगतो सी-वोटरचा सर्व्हे
याचवेळी त्यांनी आमदार नितेश राणेंवरही निशाणा साधला आहे. मंत्री नितेश राणेंनी घटनेचा सखोल अभ्यास केलेला नाही. जर त्यांचा संविधानावर विश्वास असता, तर त्यांनी असे वक्तव्य केले नसते. त्यांना देश मनुस्मृतीच्या आधारे चालवायचा आहे की संविधानाच्या चौकटीत, असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. दोन धर्मांमध्ये द्वेष पसरवला जात असेल, तर हा संविधान आणि मंत्रिपदाचा अपमान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.