दिल्ली विधानसभेत कोणाची सत्ता येणार? (फोटो- सोशल मिडिया/टीम नवराष्ट्र)
नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. 5 तारखेला मतदान आणि 8 तारखेला निकल जाहीर होणार आहेत. प्रचार देखील जोरदारपणे केला जात आहे. आम आदमी पक्ष, भाजप आणि कॉँग्रेस यांच्यात मुख्य लढत होत आहे. दरम्यान जसजशी निवडणूक जवळ येत आहे. त्यानुसार जनतेचा मूड बदलत आहे. दिल्लीच्या 70 जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. 8 तारखेला स्पष्ट होणारच आहे की दिल्लीत कोणाचे सरकार होणार आहे. मात्र त्याआधी जनतेचा मूड काय आहे, हे जाणून घेऊयात. या निवडणुकीत भाजप विरुद्ध आप यांच्यात मुख्य लढत होताना पाहायला मिळणार आहे.
कॉँग्रेस देखील दिल्ली निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. कॉँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवत आहे. तीन पक्ष स्वतंत्र लढत असल्याने काही जागांवर अटीतटीची निवडणूक होऊ शकते. या दरम्यान सी-वोटर संस्थेने दिल्ली विधानसभेत कोणाचे सरकार येऊ शकते किंवा जनतेचा मूड काय आहे, याचा एक अंदाज घेण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्ली विधानसभेत जनतेचा मूड काय आहे हे जाणून घेऊयात.
हेही वाचा: Phalodi Satta Bazar: कोण करणार दिल्लीवर राज्य? फलोदी सट्टा बाजाराने उडवली ‘या’ पक्षांची झोप
काय आहे दिल्लीच्या जनतेचा मूड?
सी-वोटरने दिल्लीच्या जनतेला सरकार बदलायचे आहे का? अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले होते. 1 फेब्रुवारीपर्यंत घेतलेल्या अंदाजानुसार 43.9 टक्के जनता ही सध्याच्या सरकारच्या कामावर नाराज आहे. तसेच त्यांना यावलेस सत्ता बदल हवा आहे, असे जनतेचे मत दिसून आले. 10 ते 11 टक्के जनता नाराज आहे पण त्यांना सरकार बदलण्यात रस दिसून येत नाहीये. तसेच 38.3 टक्के नाराज नसून, त्यांना सरकार बदलायचे नाही असे त्यांचा मूड आहे. सरकार बदलायचे आहे बदलायचे नाही यामध्ये समान टक्केवारी पाहायला मिळत आहे. त्यामुळे दिल्लीची जनता नक्की कोणाला साथ देणार हे 8 तारखेलाच स्पष्ट होणार आहे.
कोण काबीज करणार दिल्लीची सत्ता? नव्या सर्व्हेने उडवली ‘या’ पक्षाची झोप
राजस्थानमधील फलोदी सट्टा बाजार हे आपल्या अचूक अंदाजांसाठी प्रसिद्ध आहे. राजकीय समीकरणे आणि निवडणुकीचे परिणाम याबाबत भविष्यवाणी फलोदी सट्टा बाजार करत असते. हे केवळ अंदाज असतात. हे अंदाज खरे ठरतात की नाही हे निवडणुकीचा निकाल लागल्यावरच स्पष्ट होणार आहे. फलोदी सट्टा बाजारच्या नवीन अंदाजानुसार, आम आदमी पक्षाला नुकसान होताना पाहायला मिळत आहे. तर भाजप या निवडणुकीवर हळूहळू आपली पकड मजबूत करताना पाहायला मिळत आहे. नवीन अंदाजानुसार आम आदमी पक्षाला 2 जागांवर नुकसान होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: Phalodi Satta Bazar: कोण काबीज करणार दिल्लीची सत्ता? नव्या सर्व्हेने उडवली ‘या’ पक्षाची झोप
भाजपला फायदा?
भाजप या निवडणुकीत 31 ते 33 जागा जिंकण्याची शक्यता आहे. मात्र भाजप बहुमताचा आकडा पार करेल असे वाटत नाही. सध्या सुरू असलेला प्रचार आणि इतर गोष्टी यांमुळे भाजपला 2 जागांवर बढत मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या निवडणुकीत दिल्लीची सत्ता कोण काबीज करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कॉँग्रेसदेखील ही निवडणूक स्वबळावर लढवत आहे. मात्र मुख्य लढत ही आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये होताना दिसून येत आहे.