मुंबई : आज रविवार २५ सप्टेंबर रोजी लोकल ट्रेनने प्रवास करण्याचा प्लॅन असेल तर त्याआधी आज रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉकचे वेळापत्रक आणि स्थिती जाणून घ्या. २५ सप्टेंबर रोजी रविवार असल्यामुळे अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वे उपनगरीय स्थानकांवर मेगाब्लॉक (Megablock)घेणार आहे. या काळात अनेक गाड्यांवर परिणाम होणार आहे. कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी, प्रवासी येथून मेगा ब्लॉक दरम्यान प्रभावित होणार्या गाड्यांचे तपशील तपासू शकतात.
मध्य रेल्वे :
सकाळी ११. ०५ ते दुपारी ३. ४५ वाजेपर्यंत माटुंगा-ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर परिणाम होईल. सकाळी १०. १४ ते दुपारी ३. १८ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान वळवल्या जातील. सीआरने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, गाड्या त्यांच्या नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिरा धावतील. तर कल्याणहून सकाळी १०. २५ ते दुपारी ३. १० या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल सेवा ठाणे ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल, या सेवा ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. या लोकल रेल्वे नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डीएन लोकल नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
हार्बर मार्ग:
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११:४० ते दुपारी ४:४० वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११. १० ते दुपारी४. १० वाजेपर्यंत परिणाम दिसेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोडवरून सकाळी ११. १६ ते दुपारी ४. ४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणारी हार्बर मार्गिका आणि सकाळी १०.४८ ते दुपारी ४: ४३ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सुटणारी वांद्रे/गोरेगाव डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९ :५३ ते दुपारी ३:२०पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०:४५ ते सायंकाळी ५:१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
मेगाब्लॉक दरम्यान विशेष गाड्या :
मेगाब्लॉक दरम्यान पनवेल आणि कुर्ला दरम्यान २० मिनिटांच्या अंतराने विशेष लोकल सेवा चालवण्यात येईल आणि ब्लॉक कालावधीत प्रवाशांना मेन लाइन आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी असेल.