रायगड जिल्ह्याचे नावच स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यावरुन पडले आहे. या जिल्ह्यात असंख्य गड आणि दुर्ग आहेत. तब्बल 53 किल्ले या जिल्ह्याला लाभले आहेत. सह्याद्रीच्या डोगंरकपारीपासून ते सिंध सागरापर्यंत गड किल्ल्यांचा वारसा या जिल्ह्याला लाभला आहे. हे गडकिल्ले मराठ्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत. येथील कण कण मराठ्यांच्या इतिहासाची गाथा सांगतात. त्यातील काही महत्वाच्या किल्ल्यांबद्दल जाणून घेऊया.
फोटो सौजन्य- सोशल मीडिया
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला रायगड किल्ला हा महाराष्ट्रातील लोकांसाठी तीर्थस्थळासारखा आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, जगदीश्वराचे मंदिर, हिरकणी कडा इत्यादी ठिकाणे आहेत.
कुलाबा किल्ला हा मराठा साम्राज्याचा अतिशय महत्वपूर्ण सागरी किल्ला होता. हा किल्ला पश्चिम किनाऱ्यावरती समुद्रामध्ये अलिबाग शहरानजीक आहे. रायगड जिल्ह्याचे पूर्वी कुलाबा हे नाव होते.
मुरुड-जंजिरा किल्ला हा जलदुर्ग असून तो अरबी समुद्रकिनाऱ्यावरती वसलेल्या मुरुड शहरानजीक आहे. मुरुड-जंजिरा किल्ल्यावरती असलेल्या तीन महाकाय तोफा – ‘कालालबंगडी’,‘चावरी’,‘लांडा कासम’या किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहेत.
कर्नाळा हा रायगडमधील पनवेल तालुक्यातील किल्ला आहे. कर्नाळा किल्ला हा पक्षी अभयारण्यात येतो. कर्नाळा किल्ल्यावर करणाई देवीचे मंदिर, तटबंदी, जुने बांधकाम व थंड पाण्याच्या टाक्या आहेत.
सुधागड रायगड जिल्ह्यातील पाली या ठिकाणापासून पूर्वेकडे १० किमी अंतरावर आहे. पूर्वी या गडाचे नाव भोरपगड होते ते शिवाजी महाराजांनी बदलून सुधागड किल्ला असे केले.