बनावट कंपनी, खोटा व्यापार अन् खातेही खोटेच; गुंतवणुकीच्या नावावर 155 कोटींची फसवणूक
नागपूर : लकडगंज पोलिस स्टेशन परिसरात कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरात कामासाठी नागपूरला आलेल्या एकाच्या नावाने बनावट खाते उघडले, त्याला कमाईत वाटा देण्याचे आश्वासन दिले. नंतर त्याच्याच नावाने बनावट कंपनी उघडली आणि कोट्यवधी रुपयांची हेराफेरी सुरू केली.
पीडिताला जेव्हा या व्यवहाराची माहिती मिळाली तेव्हा त्याने विरोध केला. व्यापाऱ्यांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. शेवटी पीडितेने धाडस करीत पोलिसांमध्ये धाव घेतली. गुन्हे शाखेने याचा तपास हाती घेतला आणि ही हेराफेरी पाहून पोलिसही चक्रावले. बंगाली पंजा येथील विश्वजित सुधांशू रॉय (39) यांच्या फिर्यादीवरून लकडगंज पोलिस ठाण्यात या प्रकरणात 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भंगार आणि लोखंडी चोरीसाठी कुख्यात बंटी शाहू, जयेश शाहू, अविनाश शाह, ऋषी लखानी, आनंद हरडे, राजेश शाहू, ब्रिजकिशोर मनिहार आणि अंशुल मिश्रा यांचा या आरोपींमध्ये समावेश आहे, विश्वजित हा मूळचा पश्चिम बंगालमधील हुगळीचा आहे. तो तिथे फास्ट फूडचे दुकान चालवायचा. 2023 मध्ये त्याच्या वडिलांचे निधन झाले. उपचाराच्या खर्चामुळे विश्वजितची आर्थिक परिस्थिती खालावली. गावात राहणारा विश्वजितचा मित्र सूरज उर्फ प्रीतम केडिया नागपूरमध्ये काम करत होता. विश्वजितने त्याला नोकरी मिळवून देण्यास सांगितले.
सूरजने त्याला नागपूरला बोलावले. जून 2024 मध्ये विश्वजीत स्वजीत नागपूरला आला सूरज त्यांना जुना भंडारा लासूरज रोडवरील स्मॉल फैक्टरी एरियामधील प्रीतम कॉम्प्लेक्समध्ये घेऊन गेला, लिये त्याने बंटी, जयेश, अविनाश, अशी. आनंद, राजेश, बिजकिसोर आणि अंशुल यांच्याशी ओळख करून दिली. आरोपींने विश्वजितल्या नावाने बाजारात पैसे गुंतविले. जो काही नफा होईल त्यात त्याला दरमहा वाटा देण्याचे आमिषही दाखविले बेरोजगार असल्याने विश्वजितही वासाठी तयार झाला. आरोपीनी विश्वजितकडून आधार आणि पैन कार्ड मिळविले. काही कागदपत्रांवर त्याच्या सहज घेतल्या, वाठोडा कॉम्प्लेक्समधील राजेश शाहुव्या गोदामात त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. ३ ऑगस्ट 2024 ला अविनाशने विश्वजितच्या नावाने एअरटेलचे सिम कार्ड घेतले. ओटीपी लागेल असे सांगून त्याने सिम कार्ड स्थत कड़े ठेवले, त्याने सुरुवातीला त्याच् त्याचा वाटा म्हणून 25 हजार रुपयेही दिले. काही वाळानंतर विश्वजितला आपल्या व्यवाने क्षितिज एंटरप्रायझेस नावाची कंपनी उघडल्याचे आढलले.
वेगवेगळ्या फर्म आणि दुकानदारांना वस्तु विकण्यासाठी कंपनीच्या नावाने बनावट बिले बनचली गेली. प्रत्यक्षात कोणताही माल विकला गेला नाही. बिलाची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर, खात्यातून पैसे काढले गेले आणि व्यापाऱ्यांना रोख रक्कम परत करण्यात आली. 9 सप्टेंबर ते 30 डिसेंबर 2024 दरम्यान आरोपीनी विश्वजितच्या नावाने उपहलेल्या क्षितिज एंटरप्रायझेससोबत 96 कोटी 35 लाख रुपयांचे व्यवहार केले, आरोपीनी अमरावती रोडवरील व्याहाळपेठ येथील रहिवासी मियुग सगु राजपांडे यांच्या नावाने अवध एंटरप्रायझेस नावाची फर्म उपहली वा फर्मच्या माध्यमातून बनावट ट्रेडिंगद्वारे 59 कोटी 51 लाख रुपयांचे व्यवहार करण्यात आले. ऑनलाइन जुगार खेल आणि हवालासाठी पैसे लॉडरींग केले जात असल्याची माहिती विश्वजितला मिळाली.
विश्वजीतला प्रकार समजला तेव्हा त्याने आपल्या नावाचा वापर करून होणारे हे व्यवहार थांबवण्यास सागितले. परंतु आरोपीनी त्याला जीवे मारण्याची यमकी देत गप्प राहण्यास सांगितले. आरोपींनी त्याच्या नावाचा वापर करून 60 ते 70 कंपन्यांची नोंदणी केली होती. फक्त 2 कंपन्यांकडून 155 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. इतर कंपन्यांची चौकशी केल्यानंतर, ही फसवणूक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते.