पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी (Nashik Agricultural Produce Market Committee) मतदानाची प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली असून, नाशिक, त्रंबकेश्वर आणि पेठ तालुक्यासाठी होणाऱ्या मतदानासाठी सहकारी संस्थेसाठी सहा मतदान केंद्र आणि ग्रामपंचायत गटाच्या मतदानासाठी सात मतदान केंद्र (Poll Booth) उभारण्यात आली आहे. आज सकाळपासून मतदान सुरु झाले आहे. 30 हजारपेक्षा अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण निवडणुकीमध्ये 15 जागांसाठी 37 उमेदवार झाली असून, तीन तालुक्यांमध्ये एकूण 17 आपले नशीब आजमावत असून चुंभळे आणि मतदान केंद्र उभारण्यात आली आहे. यामध्ये पिंगळे यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत होणार सहकारी संस्थेचे 1 हजार 322 मतदार आणि असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यासाठी दोन्ही ग्रामपंचायत गटाचे 2 हजार 66 मतदार आपल्या नेत्यांनी सक्षम पॅनलची निर्मिती करून भक्कम मतदानाचा हक्क बजावणार आहे.
येथे होत आहे मतदान
गिरणारे येथील जि. प. प्राथमिक शाळा खोली क्रमांक 1. मनपा शाळा क्रमांक 86 आणि 87 पाथर्डी गांव, मनपा शाळा क्रमांक 51. खोली क्रमांक 1. सिन्नर फाटा, दादासाहेब बिडकर महाविद्यालय पेठ, खोली क्रमांक 1. आणि जि. प. प्राथमिक शाळा, ठाणापाडा, खोली क्रमांक 1 आणि जि. प. प्राथमिक शाळा, मुले खोली क्रमांक 1 अशी सहा मतदान केंद्र ठेवण्यात आली आहे.
18 संचालकपदांची निवडणूक बिनविरोध
नाशिक जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव बसवंत, लासलगाव या मोठ्या बाजार समित्यांबरोबरच घोटी, देवळा, कळवण, दिंडोरी, चांदवड, येवला, नांदगाव, सिन्नर, मालेगाव, मनमाड आणि सुरगाणा अशा 14 कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये सुरगाणा बाजार समितीच्या सर्वच्या सर्व 18 संचालकपदांची निवडणूक ही बिनविरोध पार पडली आहे. उर्वरित 13 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 223 जागांकरिता 537 उमेदवारांचे भवितव्य आज मतदार ठरवणार आहे.