शहरातील पोलीस आणि गणेश मंडळांची गणपतीपूर्वी नाशिक भीष्मराज सभागृहामध्ये बैठक
पुढील काही दिवसात येऊ घातलेले दहीहंडी उत्सव, गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या सणांच्या तयारीसाठी बुधवारी परिमंडळ दहाच्या वतीने बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.
नाशिक : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव हा सण येऊन ठेपला आहे. मुंबईत दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. याच भव्य दिव्य आणि देशभरात चर्चा असलेल्या मुंबईच्या दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या बैठकींना देखील सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसात येऊ घातलेले दहीहंडी उत्सव, गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या सणांच्या तयारीसाठी बुधवारी परिमंडळ दहाच्या वतीने बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर आज नाशिकमध्ये सुद्धा गणेश मंडळांची गणपतीपूर्वी नाशिक भीष्मराज सभागृहामध्ये बैठक पार पडली.
या बैठकीत दहीहंडी मंडळ आयोजक गणपती मंडळ आणि ईद-ए-मिलाद साजरा करणाऱ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. परिमंडळ १० चे डीसीपी दत्तात्रय नलावडे यांनी उपस्थित दहीहंडी आयोजक गणेशोत्सव मंडळ आणि साजरी करणाऱ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या सर्वांमध्ये समन्वय साधण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजक आणि मंडळांकडून काही सूचना देखील करण्यात आल्या यावर मार्ग काढण्यासाठी या बैठकीचा आयोजन करण्यात आले होते.
त्याच पार्श्वभूमीवर आज नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या भीष्मराज सभागृहामध्ये पोलीस अधिकारी मनपा अधिकारी गणेश मंडळाचे पदाधिकारी यांच्या समवेत संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचबरोबर त्यांचे निराकारण करण्यात येईल असे आश्वासन देखील दिले आहे. गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी वेळ वाढवून देण्यात यावा अशी मागणी गणेश मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी केली. परंतु राज्य शासनाच्या नियमावलीनुसारच ही मिरवणूक पार पडेल असे पोलीस आयुक्तांनी यावेळी सांगितले.
Web Title: Nashik police ganesha mandals meeting mumbai police dahihandi