रुग्णालयातील नवजात शिशू विभागात आग, ६९ बालकांना सुरक्षित ठिकाणी हलविले
Nashik Fire News in Marathi : नाशिक जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशू विभागाला आग लागल्याची घटना घडली. ही आग 3 एप्रिल संध्याकाळच्या वेळेत लागली असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळत आहे. या शिशू विभागातील नवजात बालकांना सुरक्षित ठीकाणी हलविण्यात आले असून एकूण 69 बालक सुरक्षित असल्याची माहिती नाशिक जिल्ह्यातील रुग्णालयातून देण्यात आली आहे.
जिल्हा रूग्णालयात अचानक शॉर्ट सर्किट झाले व आग लागली. तातडीने रूग्णालय प्रशासनाने नवजात बालकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. आग लागल्याचे कळताच तेथील कर्मचाऱ्यांची आणि डॉक्टरांची एकच धावपळ उडाली. नाशिक जिल्हा रूग्णालयात शॉर्ट सर्किट कशामुळे झाले आणि आग कशामुळे लागली याचे कारण समोर आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच रूग्णालयात नातेवाइकांनी एकच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.