पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (फोटो- सोशल मीडिया)
या भूखंडामध्ये शैक्षणिक वापराचे ३ भूखंड, वाणिज्य व सार्वजनिक सुविधेचे ११ भूखंड, वैद्यकीय वापराचे १ भूखंड, सार्वजनिक सुविधा (लायब्ररी / संगीत शाळा) १ भूखंड, (Facility Center) १ भूखंड आणि सुविधा भूखंड (Amenity Space) २९ भूखंड असे एकूण ४६ भूखंड यांचे ८० वर्षाच्या कालावधीसाठी भाडेपट्टयाने ई-लिलावाव्दारे वाटप होणार आहे.तांत्रिकदृष्ट्या पात्र बोलीधारकांची घोषणा दि. ६ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार असून दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता संकेतस्थळावर ई- लिलाव प्रक्रिया सुरु होणार आहे.
सदर ई- लिलाव प्रक्रियेसंबधी सूचना सविस्तर अटी व शर्तीचे माहितीपुस्तिका https://eauction.gov.in व https://pmrda.gov.in या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी मुदतीपूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहेत.वाढते अपघात रोखण्यासाठी PMRDA ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
हिंजवडी आयटी पार्क परिसरात अवजड वाहनांमुळे वाढलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) निर्णायक पावले उचलली आहेत. परिसरात अवजड वाहनांच्या प्रवेशावर आता वेळेचे निर्बंध, चालकांची नशेची तपासणी आणि वाहतूक नियमांचे पालन या अटी बंधनकारक करण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची कामे तात्पुरती थांबवण्यात येणार आहेत, असा इशारा पीएमआरडीएकडून देण्यात आला आहे.
हिंजवडी ‘IT पार्क’ घेणार मोकळा श्वास! वाढते अपघात रोखण्यासाठी PMRDA ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
अपघातांच्या मालिकेनंतर प्रशासन सजग
अवजड वाहनांमुळे हिंजवडी व आसपासच्या भागात गेल्या काही महिन्यांत अनेक अपघात घडले असून, काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी प्रशासनाकडे ठोस उपाययोजनांची मागणी करत मोर्चा काढला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची व बांधकाम व्यावसायिकांची बैठक झाली. या बैठकीत हिंजवडी, माण, म्हाळुंगे परिसरात पोलिसांनी निश्चित केलेल्या वेळेतच अवजड वाहनांना प्रवेश द्यावा, असा निर्णय घेण्यात आला. तसेच वाहनचालक नशेत नसल्याची खात्री, वैध परवाना आणि संबंधित वाहनांची संपूर्ण माहिती प्रकल्पाच्या संकेतस्थळावर अद्ययावत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.