मालेगाव : चांदवड तालुक्यातील मनमाड – लासलगाव रस्त्यावर झालेल्या खुन प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधातून मेहुण्याने शालकाचा खून केल्याचे उघडकीस आले असून यासंदर्भात जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील यांनी मालेगाव येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
मनमाड – लासलगाव रस्त्यावर वागदर्डी धरणाजवळील एका पडीत जागेवर चांदवड पोलीस ठाणे हद्दीत ७ फेब्रुवारी रोजी अज्ञात इसमाने एका तरुणाची तीक्ष्ण हत्याराने ठार मारल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी सदर घटनेबाबत तात्काळ गुन्हा दाखल करून खुनाचा तपास लवकरात लवकर करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा व चांदवड पोलीस यांना दिले होते.
[read_also content=”राज्य मंत्रिमंडळांचा मोठा निर्णय! ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेच्या आर्थिक निकषात वाढ https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/thakkar-bappa-tribal-settlement-improvement-scheme-financial-criteria-increase-state-cabinet-decision-235380.html”]
या प्रकरणी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व समीर बारावरकर यांनी पोलीस पथकांना मनमाड चांदवड रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्यास सांगितले. यात संशयित आरोपीची माहिती मिळाली. पोलिसांनी चांदवड तालुक्यातील गंगावे या गावात जाऊन आरोपी दत्तात्रय विश्वनाथ उबाळे यांची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. सखोल चौकशी केली असता आरोपी दत्तात्रय विश्वनाथ उबाळे याने गुन्हा केल्याची कबुली दिली. मृत व आरोपी हे नात्याने शालक मेहुणे असल्याचे तपासात समोर आले आहे. मेहुण्याने शालकाचा अनैतिक संबंधातून खून केल्याचे उघडकीस आले असून आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारावरकर हे पुढील तपास करीत आहे.
[read_also content=”हुपरी उपनगराध्यक्षापदी लक्ष्मी साळोखे यांची बिनविरोध निवड https://www.navarashtra.com/kolhapur/paschim-maharashtra/kolhapur/lakshmi-salokhe-unopposed-elected-as-hupari-deputy-mayor-nrka-235394.html”]