फोटो - सोशल मीडिया
बारामती : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यासाठी सर्वच नेत्यांनी आणि घटक पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. महायुतीसह महाविकास आघाडीचे नेते जोरदार प्रचार करत आहेत. प्रचारासाठी अजित पवार गटाकडून जनसन्मान यात्रा काढली गेली आहे तर शरद पवार गटाकडून शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदाच्या विधानसभा प्रचारामध्ये अजित पवार यांनी गुलाबी वादळ आणलं आहे. गुलाबी जॅकेट, गुलाबी फेटा यामुळे सर्वत्र प्रचारामध्ये रंगत आणली आहे. दरम्यान, अजित पवार यांचं नवीन गाणं देखील लॉन्च करण्यात आलं आहे. दादाचा वादा हे गाणं सध्या धुमाकूळ घालत आहे.
यापूर्वी देखील अनेक पक्षांकडून पक्षाची प्रचार गीत प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांची प्रचार गीत लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. आता पुन्हा एकदा नवीन गाणं अजित पवार गटाकडून लॉंन्च करण्यात आलं आहे. यामध्ये अजित पवार यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला असून विविध विकासकामांची माहिती दिली आहे. तसेच लाभार्थी आणि अजित पवारांच्या कामावर खुष असलेले नागरिक दाखवण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये देखील गुलाबी रंगाचा प्रभाव दिसून येत आहे. अजित पवार यांच्यासह सर्वांना गुलाबी रंगा फेव्हर चढला आहे. दादांचा वादा गाण्याची चाल आणि गीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं नवीन ‘दादाचा वादा’ गाणं
आर कोण पार कोण ये, दादाचा वादा
पक्का आधार कोण ये, दादाचा वादा
दम दम दमणार कोण ये, दादाचा वादा
आपलं सरकार कोण ये, दादाचा वादा
शब्दाचा ठाम कोण ये, दादाचा वादा
रक्ताचा घाम कोण ये, दादाचा वादा,
असे या गाण्याचे बोल आहेत. यामध्ये अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचे चित्र दाखवण्यात आली आहेत. तसंच राष्ट्रवादी आणि घड्याळ चिन्हाचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. जुना काळ बदलला आहे, आता वेळ बघा… बघा बघा आता घड्याळाचा खेळ बघा…असे या गाण्यामध्ये सांगण्यात आले आहे. त्यामुळे घड्याळ तेच पण वेळ नवी असे अजित पवारांच्या गाण्यातून सूचित करण्यात येत आहे.
सांगून आलोया थांबायचं नाय आता,
जिंकायचं हाय म्हणजे जिंकायचं हाय,
गुलाल आपलाच उधळायचा तोवर,
मागं पुढे आता बघायचं नाय…धडाधडा काम सपाट्याचा आता वेग धरा,
धराधराधरा आता ध्यास आता एक धरा…जोश धगधगता अंगात रगरगता,
ऐकणार नाय कुणा आता…#DadaChaWada pic.twitter.com/F7XHY4ksnU— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 8, 2024
‘काम करत आलोय काम करत राहू’ गाणे
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून हे दादांचा वादा हे गाणं लॉन्च करण्यात आलं आहे. त्याचबरोबर यापूर्वी देखील अजित पवार यांनी एक गाणं लॉन्च केलं होतं. अजित पवाराचं हे गाणं ‘काम करत आलोय काम करत राहू’ असे या गाण्याचे बोल असून ‘आता वादा आपला पक्का’ असे वचन देण्यात आले होते. यामध्ये त्यांच्या पक्षाने केलेले काम, भूमीपूजन, लोकार्पण आणि उद्घाटन अशी विविध प्रसंग दाखवण्यात आले आहे. या गाण्यामध्ये अजित पवार गटाचे सर्व नेते दाखवण्यात आले होते. आता दादाच्या वादा गाण्यामध्ये फक्त अजित पवार यांना हायलाईट करण्यात आले आहे.
गीत राष्ट्रवादी, सन्मान महाराष्ट्रवादी!
आलंय राष्ट्रवादीचं नवं गाणं!#जनसन्मान_यात्रा #JanSanmanYatra pic.twitter.com/rf9AAwKLup— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 8, 2024