स्टंटबाजी नडली! बाईक हवेत उचलून स्टंट करायला गेला अन् थेट जमिनीवर आदळला, एका झटक्यात हिरोगिरी बाहेर , VIDEO VIRAL
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुण वाऱ्याच्या वेगाने हायवेवर बाईक चालवत आहे. तरुण बाईक चालवत असताना त्याचाच एक मित्र याचे रेकॉर्डिंगही करत आहे. तुम्ही पाहू शकता की, तरुणाने बाईक वेगाने पळवत अचानाक हवेत उचलून घेतली आहे. काही वेळ बाईक एका चाकावर हवेत धावत आहे. परंतु याच वेळी तरुणाचा बाईकवरुन अचानक तोल जातो आणि थेट जमिनीवर आदळतो. तसेच बाईक देखील तशीच फरपटत पुढे जाते. तरुण मागे जमिनीवरु आदळून दोन वेळा गोल फिरुन पडतो. सुदैवाने तरुणासोबत कोणतीही दुर्वैवी घटना घडलेली नाही. परंतु तरुण चुकूनही डोक्यावर आदळला असता, बाईकचा स्फोट झाला असतात तर गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता होती.
व्हायरल व्हिडिओ
1M view पाने के लिए विडियो बनाया था,
अब 2M पहोंच गया है 😂😂 pic.twitter.com/nEal9nyzzr — TANVEER (@mdtanveer87) January 17, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @mdtanveer87 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. परंतु यावर अनेकांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. एकाने रिलसाठी असा जीव धोक्यात घालणे योग्य नाही असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने यमराज चाचा सुट्टीवर आहेत वाटतं असे म्हटले आहे. तर एकाने अशा लोकांना हाणला पाहिजे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तीव्र व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






