कोण म्हणतंय कृषीपुरक व्यवसांयामध्ये पैसा नाही, पट्ट्याने ४० कोटीला विकली गाय, भारतातील या राज्यात होते पैदास
40 Crore Cow : एका भारतीय जातीच्या गायीने लिलावात जगातील सर्वात महागडी गाय होण्याचा नवा विक्रम प्रस्थापित करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. ब्राझीलमधील मिनास गेराईस येथे झालेल्या लिलावात ही गाय ४० कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली. या नेल्लोर जातीच्या गायीचे नाव व्हिएटिना-१९ आहे. या गायीचे वजन ११०१ किलो आहे, जे तिच्या त्याच जातीच्या इतर गायींच्या सरासरी वजनाच्या दुप्पट आहे. ही गाय ४.८ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ४० कोटी रुपये) ला खरेदी करण्यात आली आणि त्यामुळे ती जगातील सर्वात महागडी गाय ठरली आहे.
मोफत रेशन घेणाऱ्यांवर आता Income Tax ची करडी नजर, ‘या’ यादीत नाव असेल तर गहू-तांदळालादेखील मुकणार
पार्टनर इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, व्हिएटिना-१९ ही काही सामान्य गाय नाही. जगातील दुर्मिळ वानांपैकी एक आणि शरीरयष्टीमुळे त्याला जागतिक मान्यता मिळाली आहे. या गायीला प्रतिष्ठित चॅम्पियन्स ऑफ द वर्ल्ड स्पर्धेत मिस साउथ अमेरिकाचा किताबही मिळाला आहे. या गायीच्या वैशिष्ट्यामुळे, जगात मोठी मागणी आहे. जगभरातील पशुपालन कार्यक्रमांना चालना देण्यासाठी या गायीची वासरं जगभर निर्यात केली जातात.
या नेल्लोर जातीच्या गायीला भारतात ओंगोल जातीची गाय म्हणूनही ओळखलं जातं. भारतातील आंध्र प्रदेशातील ओंगोल प्रदेशात जन्मलेल्या या गायीमंध्ये अतिउष्णतेचा सामना करण्याची क्षमता असते. मजबूत रोग प्रतिकारशक्तीमुळे या गायींना आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील उष्णकटिबंधीय आणि अतिउष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये मोठं महत्त्व आहे.
या जातीला खास बनवणारी गोष्ट म्हणजे, या गायीची जास्त काळजी घेण्याची गरज लागत नाही. तसंच या गायीची शारीरिक रचना तिला अधिक आकर्षक बनवते. आकर्षक शुभ्र पांढऱ्या रंगाची त्वचा , आकर्षक कुबड आणि सैल त्वचा यामुळे ही गाय सुंदरच दिसत नाही तर उष्णतेशी लढण्यासाठी देखील सज्ज असते. सैल त्वचा उष्णता नष्ट करण्यास मदत करते, तर कुबड चरबी साठवते, ज्यामुळे अन्नटंचाईच्या काळात गाय स्वतःचे पोषण करू शकते.
व्हिएटिना-१९ ची विक्री नेल्लोर जातीची वाढती मागणी दर्शवते. १८०० च्या दशकात ब्राझीलमध्ये या जातीच्या गायी पहिल्यांदा आणण्यात आल्या. तिच्या प्रभावी स्नायूंच्या बांधणीमुळे आणि उच्च प्रजननक्षमतेमुळे, या गायीने ब्राझीलमध्ये पशुधन उत्पादकता वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.