कणकवली : राज्यामध्ये मागील मागील २ दिवसांपासून मुसळधार पावसाळा सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईमध्ये मागील २४ तासांपासून मुसळधार पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. तर राजापूरमध्ये आलेल्या पुरात ५६ लोक अडकले होते. या मुसळधार पावसाचा प्रभाव अनेक जिल्ह्यांमध्ये दिसून आला आहे. कणकवलीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत नव्याने आलिशान बांधलेल्या शासकीय विश्रामगृहाला पहिल्याच पावसामध्ये गळती लागल्याचे चित्र दिसून आले आहे. विश्रामगृहामध्ये गळती झाल्यामुळे जागोजागी ओले झाले आहे.
दोन महिन्यांपूर्वी या शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन मोठा गाजावाजात करण्यात आले होते. एवढेच नव्हे तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते याचे उद्घाटन आले होते. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या या विश्रामगृहाची अवस्था जर ही असेल तर सिंधुदुर्गमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्वच कामांची अवस्था अशीच असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांनी केला आहे. या विश्रामगृहाची पाहणी केल्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधून प्रश्न उपस्थित केले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्वच कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि भ्रष्टाचार झाला आहे. यासंदर्भात मी आमदार म्हणून आवाज उठवणार असून, बांधकाम मंत्र्यांना आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना या प्रश्नी जाब विचारला जाईल असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला. आज सकाळी कणकवलीतील या गळती लागलेल्या शासकीय विश्रामगृहाची पाहणी आमदार वैभव नाईक यांनी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता के.के. प्रभू या देखील उपस्थित होत्या.
मुंबई,नवी मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी विशेषतः कोकण पट्टयात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहेत. त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.