पिंपरी : मावळ लोकसभा मतदार संघाच्या काँग्रेसच्या निरीक्षक, पक्षाच्या कार्याध्यक्ष आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी चिंचवडमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघा संदर्भात नुकतीच आढावा बैठक घेतली. जोपर्यंत मावळ आपला होत नाही तोपर्यंत येथे येतच राहणार. मावळ हा काँग्रेसचाच असणार आहे. ‘समझनें वालो को इशारा काफी है, असे सांगत त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला मावळमध्ये आव्हान दिले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने स्थानिक पातळीवरील राजकीय स्थितीची माहिती घेण्याकरता निरीक्षक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे, चारुलता टोकस, आमदार संजय जगताप, पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, पिंपरी चिंचवड कॉंग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष भरत वाल्हेकर यांच्या उपस्थितीमध्ये चिंचवड येथे बैठक संपन्न झाली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया वाल्हेकर, जयश्री खैरे, हरमिंदरजीत राय, रामचंद्र वांजळे, स्मिता वाल्हेकर, वैशाली वाल्हेकर, निगारताई बारसकर, मीनाताई वाल्हेकर यांच्यासह मावळ लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रणिती शिंदे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा ठोकत असतानाच पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष तथा कामगार नेते कैलास कदम यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. दरम्यान, भरत वाल्हेकर यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
या बैठकीचे नियोजन इक्वाल शेख, गौरव खैरे, यश वाल्हेकर, आकाश खैरे, पूजा वाल्हेकर, अनन्या वाल्हेकर, माऊली मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, विश्वास गजरमल, गणेश कोळपे, बबलू पठाण, विकास कावळे, प्रशांत डोंगरे, विशाल गवळी, संदीप काटे, साहिल शर्मा, शुभम लकडे, राकेश कोकाटे, धावण कुमार, शिवाजी मदनसुरे, सुदर्शन धाडवे, श्रीमंत कोळपे, दिलीप सुतार, यांनी केले.
Web Title: Next mp of maval will be from congress mla praniti shinde nrab