दिवाळी सणाला सर्वच महिला सुंदर नटून थटून तयार होतात. सणावाराच्या दिवशी सुंदर दिसण्यासाठी मेकअप केला जातो. यासोबतच केसांची आकर्षक हेअर स्टाईल करून स्टायलिश लुक केला जातो. बऱ्याचदा केसांची नेमकी कशी हेअर स्टाईल करावी, हे सुचत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला घाईगडबडीमध्ये स्टायलिश आणि आकर्षक दिसण्यासाठी काही सुंदर हेअर स्टाईल सांगणार आहोत. हेअर स्टाईल केल्यानंतर केसांमध्ये गजरा घातल्यास केस अतिशय सुंदर दिसतील. (फोटो सौजन्य: Pinterest)
सणावाराच्या दिवसांमध्ये मॉर्डन आणि पारंपरिक लुकसाठी करा 'या' स्टायलिश हेअर स्टाईल
लांब केस असलेल्या महिला प्रामुख्याने केसांची वेणी घालतात. पण तुम्ही लुक आणखीनच सुंदर करण्यासाठी या पद्धतीने केसांमध्ये वेणी घालून त्यावर सुंदर रंगीत फुलांचे गजरे घालू शकता.
अंबाडा घालून त्यावर मोगऱ्याच्या फुलांचा गजरा घातल्यास लुक पारंपरिक दिसेल. पैठणी किंवा कांजीवरम सिल्क साडी नेसल्यानंतर या पद्धतीने केलेली हेअर स्टाईल सुंदर दिसेल.
दिवाळी पार्टीला जाताना किंवा पाहुण्यांच्या घरी जाताना तुम्ही या पद्धतीने केस मोकळे सोडून केसांमध्ये कोणत्याही फुलांचा गजरा घालू शकता.
काहींना केसांमध्ये खूप जास्त गजरे घालायला आवडतात. अशावेळी तुम्ही संपूर्ण अंबाड्याभोवती गजरा माळू शकता. गजरा व्यवस्थित राहण्यासाठी पिन जास्त लावावेत.
शॉर्ट केस असलेल्या महिलांनी या पद्धतीने केसांची हेअर स्टाईल करावी. ही हेअर स्टाईल झटपट होते. केसांमध्ये मोगऱ्याच्या फुलांचा गजरा घातल्यास केस अतिशय सुंदर वाटतील.