निमसाखर :लातूर येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या कुमार महाराष्ट्र केसरी पात्रता स्पर्धेकरिता झालेल्या लातूर जिल्हा निवड चाचणी कुस्तीमध्ये ११० किलो वजनी गटात निमसाखर (ता. इंदापूर) येथील सुपुत्र व्यंकटेश जितेंद्र रणवरे यांनी विजयी मिळवला आहे.
इंदापूर तालुक्यातील निमसाखरची ओळख पूर्वीपासूनच कब्बडी, कुस्ती या मैदानी खेळासाठी प्रचलित आहे. मैदानी खेळांचा हा वारसा पुढील पिढी ही चालवत आहे. लातूर जिल्हा निवड चाचणी कुस्तीत व्यंकटेश रणवरे याने विजय मिळविल्याने निमसाखर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तसेच निमसाखर व पंचक्रोशीतून व्यंकटेश रणवरे यांच्यावर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.