मुंबई : मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत युद्धपातळीवर सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. याअंतर्गत मुंबईतही पालिकेच्या यंत्रणेमार्फत हे सर्वेक्षण सुरू आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असल्या तरी मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण हे सुरूच आहे. या सर्वेक्षणावरुन अनेक मतेमतातंरे असताना भाजप आमदार नीतेश राणे यांनी सुरु असलेल्या या सर्वेक्षणाला पाठिंबा दर्शवला आहे. आमचे मुख्यमंत्री सर्वेक्षण कार्य करीत आहे त्या कार्याला आमचं पूर्ण समर्थन आहे’ असं नितेश राणे म्हणाले आहेत.
[read_also content=”‘ही हुकूमशाही आहे’, ते पलटूराम नसल्यामुळे हे घडतयं’, हेमंत सोरेनवरील कारवाईवर संजय राऊतांची टिका https://www.navarashtra.com/maharashtra/sanjay-raut-got-angry-at-the-government-due-to-eds-action-on-hemant-soren-nrps-503306.html”]
तसेच मनोज जरांगे पाटील हे पुढील आठवड्यात उपोषणाला बसणार आहेत, हा सर्वच्या सर्व विषय आहे तो मुख्यमंत्री हॅण्डल करीत आहेत, असही ते म्हणाले.
गेल्या आठ दिवसांत मुंबई महापालिकेच्या यंत्रणेने मराठा आरक्षणासाठी एकूण ७० टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. गेल्या आठ दिवसांत पालिकेच्या यंत्रणेने ३७ लाखांहून अधिक घरांना भेटी दिल्या आहेत. त्यापैकी २५ लाखांहून अधिक घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तर सव्वासात लाखांहून अधिक घरे बंद असल्याचे आढळून आले आणि तर पावणेचार लाखांहून अधिक घरांतील रहिवाशांनी या सर्वेक्षणाला नकार दिला आहे. बुधवारी सर्वेक्षणाचा शेवटचा दिवस असून एका दिवसात १ लाख ८० हजार घरांचे सर्वेक्षण करावे लागणार आहे






